आपल्या बेधडक विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहिलेल्या अभिनेत्री स्वरा भास्करचा (Swara Bhasker) आज (9 मार्च) वाढदिवस आहे. स्वरा भास्कर यंदाच्या वर्षी तिचा 32वा वाढदिवस साजरा करत आहे.
स्वराने बॉलिवूडमध्ये करिअरची सुरूवात ‘गुजारिश’ या चित्रपटातून केली होती. यानंतर स्वराने बर्याच चित्रपटांमध्ये काम केले आणि विशेष म्हणजे स्वराने आपल्या बर्याच चित्रपटांमध्ये डी-ग्लॅम पात्र साकारली असून, तिने आपल्या प्रत्येक पात्रातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
स्वराची खास बाब म्हणजे ती प्रत्येक विषयावर उघडपणे आणि बेधडकपणे बोलते. याचा कारणामुळे ती सतत चर्चेत येत असते.
‘वीरे दि वेडिंग’ चित्रपटामधील स्वरा भास्करचा मास्टरबेशन सीन खूप चर्चेत आला होता. या दृश्याबाबत बरेच वादंगही निर्माण झाले. लोक म्हणाले की, हे सर्व आपल्या संस्कृतीत बसत नाहीत. त्यासाठी स्वरालाही ट्रोलही केले गेले होते. मात्र, यावर प्रतिक्रिया देत अभिनेत्रीने सांगितले की, या दृश्याबद्दल आपल्याला बर्याच नकारात्मक प्रतिक्रिया मिळतील हे मला आधीपासूनच माहित होते, परंतु हे माझं काम आहे आणि मी ते करणारच!
नुकतेच जेव्हा स्वराला तिच्या वाढदिवसाची योजना काय आहे?, असे विचारले असता ती म्हणाली की, सध्या मी गोव्यात शूट करत असून, मला या चित्रपटाच्या सेटवर राहणे आवडत असल्याने माझ्यासाठी यापेक्षा जास्त आनंददायक दुसरे काही नाही. स्वरा पुढे म्हणाली की, तिला यंदा ‘बिकीनी बॉडी’ बनवायची आहे. त्याचवेळी स्वराला लग्नाच्या योजनांविषयी विचारले असता ती म्हणाली, ‘जेव्हा मला योग्य व्यक्ती मिळेल तेव्हाच मी लग्न करेन. कदाचित या वर्षीही लग्न होऊ शकते.’
स्वरा भास्कर शेवट नेटफ्लिक्सचा कॉमेडी वेब शो ‘भाग बीनी भाग’मध्ये दिसली होती. या शोमध्ये स्वराने स्टँड अप कॉमेडियनची भूमिका केली होती. आता स्वरा ‘शीर कोरमा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात स्वरासोबत अभिनेत्री दिव्या दत्ता मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट एलजीबीटीक्यूआयएवर आधारित असणार आहे.