Buddha Purnima : आयुष्यभर उपयोगी पडतील, जीवनाचा उत्कर्ष होईल असे संदेश… बुद्ध नेमके काय म्हणाले?
जगातील अत्यंत प्रासंगिक व्यक्तीमत्त्व तथागत गौतम बुद्ध यांची आज जयंती आहे. आजच्याच दिवशी बुद्धाचा जन्म झाला होता आणि त्यांना महापरिनिर्वाण प्राप्त झालं होतं. बुद्धाने जगाला शांतीचा मार्ग दाखवला. बुद्ध शांती, करूणा आणि अहिंसेची शिकवण देतात. बुद्ध मैत्री शिकवतात. कोणतीही गोष्ट कायम नसते. शाश्वत नसते, प्रत्येक गोष्टीला अंत असतो, असं बुद्ध सांगतात. प्रत्येक गोष्टी मागे कारण असतं, कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही, असं सांगत तथागत कार्यकारणाचा सिद्धांत अधोरेखित सांगतात. आम्ही तुम्हाला बुद्धाचे काही निवडक संदेश देत आहोत, ते तुमच्यासाठी आयुष्यभर उपयोगी पडतील.