Marathi News Photo gallery Have you seen the photos of rahul mahajans wife russian model natalia ilinas trending on social media
Photo : राहुल महाजनच्या पत्नीचे फोटो पाहिलेत?, रशियन मॉडेल नतालिया इलिनाची सोशल मीडियावर चर्चा
VN |
Updated on: May 13, 2021 | 10:38 AM
डिंपीबरोबरचे संबंध संपल्यानंतर राहुलनं 2018 मध्ये रशियन मॉडेल नतालिया इलिनाशी लग्न केलं. (Have you seen the photos of Rahul Mahajan's wife ?, Russian model Natalia Ilina's trending on social media)
1 / 6
अनेक टेलिव्हिजन शोचा एक भाग असलेले राहुल महाजन सध्या एक सुंदर आयुष्य जगत आहेत. राहुल पहिल्यांदा विवादित रिअॅलिटी शो 'बिग बॉस 2' मध्ये आणि नंतर 'बिग बॉस हल्ला बोल' मध्ये झळकला होता. 'बिग बॉस 2' नंतर राहुलनं 2010 मध्ये ‘राहुल दुल्हनिया ले जायेंगे’ हा रिअॅलिटी शोमध्ये सुरू केला होता. त्यानं त्या मोसमातील विजेता डिम्पी गांगुलीशी लग्न केलं होतं, त्यानंतर राहुल पत्नी डिम्पी महाजनसमवेत ‘नच बलिये सीझन 5’ मध्ये दिसला होता.
2 / 6
डिंपीच्या अगोदर राहुलनं 2006-2008 मध्ये श्वेता सिंगसोबत लग्न केलं होतं. डिंपीबरोबरचे संबंध संपल्यानंतर राहुलनं 2018 मध्ये रशियन मॉडेल नतालिया इलिनाशी लग्न केलं.
3 / 6
राहुल आणि त्यांची पत्नी नतालिया इलिना यांच्या नात्याबद्दल बोलायचं झालं तर ते वर्ष 2018 पासून एकत्र दिसत आहेत. हे दोघंही सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असतात आणि बर्याचदा एकमेकांसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात.
4 / 6
ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत राहुल महाजननं खुलासा केला होता की लग्नाआधी नतालियानं हिंदू धर्म स्वीकारला होता. नतालिया इन्स्टाग्रामवर खूप अॅक्टिव आहे. लाइम लाइटपासून दूर राहिल्यानंतरही तिचं खूप चांगलं फॅन फॉलोइंग आहे.
5 / 6
ती अनेकदा तिचे फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर करते, ज्यात तिचं सौंदर्य सर्वांना मोहित करतं.
6 / 6
तिच्या एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये नतालिया इलिनानं खुलासा केला होता की ती तिचे फोटो ऑडिशनसाठी आणि शोच्या कास्टिंग डायरेक्टरला पाठवत आहे, तिनं हेही शेअर केलं होतं की ती लवकरच मोठ्या किंवा छोट्या पडद्यावर डेब्यू करू शकते.