Health Tips: मधुमेहात या फळांचे सेवन धोकादायक, जरा लांबच रहा..
फळांचे सेवन आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. परंतु मधुमेहामध्ये काही फळे खाल्ल्यास साखरेची पातळी नियंत्रणाबाहेर जाऊ शकते आणि स्थिती बिघडू शकते.
-
-
मधुमेह ही एक गंभीर समस्या आहे. त्यावर कायमस्वरूपी उपचार नाही. पण रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राखून मधुमेहाच्या रुग्णांना आरोग्याची चांगली काळजी घेता येते. यासाठी सकस आहार अत्यंत आवश्यक आहे. फळं ही देखील पोषक असतात, पण मधुमेह असताना काही फळांचे सेवन हानिकारक ठरू शकते. त्यापासून दूर राहणेच उत्तम.. (Photos : Freepik)
-
-
फ्रूट ज्यूस : फ्रूट ज्यूस प्यायल्याने सामान्य व्यक्तीच्या शरीरातील ब्लड शुगरही वेगाने वाढते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी फ्रूट ज्यूस पासून लांब राहणेच फायदेशीर ठरते.
-
-
लिची : लिची एका रसाळ आणि सुरेख फळ आहे, त्यामध्ये सुमारे 16 ग्रॅम साखर असते. अशा स्थितीत मधुमेहामध्ये जास्त लिची खाणे टाळावे.
-
-
अननस : अननसामध्ये सुमारे 16 ग्रॅम साखर असते, त्याचे सेवनही कमी केले तर ते आरोग्यासाठी उत्तम असते.
-
-
केळी इतर फळांपेक्षा लवकर पिकते आणि काळी पडू लागते. फ्रिजमध्ये ठेवणं योग्य नाही, कारण त्याचा पोत आधीच थंड आहे. केळी रेफ्रिजरेटरमध्ये न ठेवता अनेक दिवस कशी साठवायची ते जाणून घेऊया.
-
-
आंबा : उन्हाळ्यात अनेकांना आंबा खायला आवडतो. पण मधुमेह असलेल्यांनी आंबा खाणे टाळावे, कारण आंब्याच्या एका सर्व्हिंगमध्ये 14 ग्रॅम साखर असते, ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.
-
-
सफरचंद : सफरचंदात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे मधुमेहींनी जास्त सफरचंद खाणे टाळावे. ( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)