Health Tips : दिवसभरात 1 तास पाळा मौनव्रत, मिळतील अगणित फायदे
तुमचा आत्मविश्वास वाढावा आणि तुम्ही बोलत असता, तेव्हा लोकांनी तुमचं म्हणणं शांतपणे ऐकावं अस तुम्हालाही वाटतं का ? मग त्यासाठी मौन पाळायला शिका.
-
-
पूर्वीच्या काळी लोकं तासन् तास मौन राहून साधना करायचे, याला आजकाल मेडिटेशन म्हणतात. पण मौन राखण्याचे काय फायदे आहेत माहीत आहे का ? नाही ? चला आज आपण जाणून घेऊया, की दिवसभरात फक्त तास मौन पाळल्याने काय फायदे मिळतात. त्यामुळे तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारू शकते, एवढेच नाही तर तुमचा आत्मविश्वासही वाढू शकतो. (Photos : Freepik)
-
-
रक्तदाब कमी करण्यासाठी मौन व्रत खूप फायदेशीर आहे. तज्ज्ञांचे असे मत आहे की, जेव्हा तुम्ही निवांत मूडमध्ये काही वेळ शांतपणे बसता तेव्हा, शरीरातील रक्तप्रवाह नियंत्रित राहतो आणि हृदयविकाराचा धोकाही कमी होऊ शकतो.
-
-
सायलेंट राहणं, शांत बसणं ही एक पॉवरफुल थेरेपी आहे. जेव्हा तुम्ही दिवसभरात फक्त एक तास शांतपणे बसून विचार करता तेव्हा मन तीक्ष्ण होते. तसेच विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता वाढवते.
-
-
दिवसभर सतत बोलत राहिल्यास थकवा येतो आणि ऊर्जाही कमी होते. अशा परिस्थितीत तुम्ही काही काळ शांत राहिलात, तर आराम मिळतो. इतकंच नाही तर काम करण्याची उर्जाही मिळते. दिवसभर तुम्हाला उत्साही वाटते. तसेच मौन पाळल्यानंतर मनही शांत होते.
-
-
शांत राहण्याचा तुमच्या संवाद कौशल्यावरही अर्थात कम्युनिकेशन स्किल्सवरही सकारात्मक परिणाम होतो. काही काळ शांत राहिलात आणि खोलवर विचार केलात तर तुम्ही लोकांचे ऐकायलाही शिकता आणि लोकांचे ऐकल्यानंतर, तुम्ही संवाद साधता तेव्हा ते उत्तम टू-वे कम्युनिकेशन होते.