जेवणानंतर या चुका करणे टाळा, नाहीतर आरोग्याला पोहोचू शकतो धोका
हेल्दी पदार्थ आणि हेल्दी सवयी आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. पण जेवणानंतर बरेच लोक अशा काही चुका करतात, ज्यामुळे आपल्या आरोग्याचे नुकसान होऊ शकते. जेवणानंतर या चुका करणे टाळावे.
1 / 5
जेवल्यावर लगेच झोपू नका : जेवणानंतर लगेच आडवे पडणे किंवा झोपणे, हे अतिशय चुकीचे आहे. यामुळे ॲसिडिटी व जळजळ होऊ शकते. त्याचा पचन क्रियेवरही विपरीत परिणाम होतो. जेवण व झोप यात कमीत कमी २ तासांचे अंतर ठेवावे. ( Photos : Freepik)
2 / 5
ब्रश न करणे : एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर किंवा जेवल्यानंतर दात स्वच्छ केले नाही तर दात आणि हिरड्या खराब होऊ शकतात. त्यामुळे अन्नाचे कण दात आणि त्यांच्यातील मोकळ्या जागेत अडकून त्रास होऊ शकतो.
3 / 5
कठोर व्यायाम टाळा : जेवल्यावर लगेचच कठोर व्यायाम करू नये. त्याा त्रास होऊ शकतो. त्याऐवजी चालणे, शतपावली असा हलका व्यायाम करावा.
4 / 5
चहा-कॉफीपासून रहा दूर : जेवणानंतर तासभर तरी चहा-कॉफी पिऊ नये. अन्यथा आरोग्याचे गंभीर नुकसान होऊ शकते. तसेच आरोग्याशी संबंधित समस्याही वाढू शकतात.
5 / 5
खूप जास्त पाणी पिऊ नका : जेवल्यानंतर कधीही लगेचच जास्त पाणी पिऊ नये. त्यामुळे पोटातील ॲसिड पातळ होऊन पचनक्रियेवर विपरीत परिणाम होऊ लागतो. त्यामुळे चुकूनही जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका. ( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)