शरीरात ब्लड शुगरचे प्रमाण वाढल्यानंतर आपल्या काळजी घ्यावी लागते. अशात आपल्याला पाच संकेत मिळल्यास समजावे की आपल्याला आता डॉक्टरांची भेट घ्यावी लागणार आहे.
तज्ज्ञांच्या मते जर आपण जादा प्रमाणात साखरेचे पदार्थ जादा खात आहोत तर आपल्या शरीरासाठी ते घातक आहे. यामुळे शरीर बेढब होण्याबरोबर टाईट टू डायबिटीजचा धोका वाढता आहे. तर पाच संकेत तुम्हाला मिळाले तर तुम्ही अलर्ट व्हायला हवे.
जेव्हा शरीरात साखरेचे प्रमाण खूप वाढते तेव्हा त्याचा प्रभाव त्वचेवर होत असतो. त्वचेवर वेळे आधीच सुरकुत्या पडू लागतात. त्वचा ड्राय होऊ लागते. आपण अकाली म्हातारे दिसू लागतो.
साखरेचे पदार्थ खाल्यास तुम्हाला ब्लोटिंगची समस्या होते. त्यामुळे पोट फुगू लागते. याचा अर्थ तुमच्या शरीरात साखरेचे प्रमाण जादा होत आहे. तुम्हाला तातडीने साखरेचे प्रमाण कमी करायला हवे. साखर पचविण्यासाठी तुमच्या पोटाला खूप मेहनत करावी लागतेय
जेव्हा तुम्ही साखर जास्त सेवन करता तेव्हा तुमची मौखीक आरोग्य बिघडते. तुमचे दात किडतात. कॅव्हीटी, हिरड्या दुखणे, त्यातून रक्त बाहेर येणे अशी लक्षणे दिसू लागतात, त्यावेळी तुम्ही साखर खाणे बंद करावी.
शरीरातील कोणत्याही भागाला सूज येऊ शकते. त्यामुळे चालताना त्रास होऊ लागतो. शरीरातील कोणत्याही भागात दुखणे म्हणजे साखरेचे प्रमाण वाढलेले असू शकते. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टराची भेट घ्यावी.
जादा साखर खाल्यानंतर रक्तातील साखर वाढते. यामुळे मुड स्विंग्स, चिडचिडेपणा आणि डिप्रेशनची समस्या वाढू शकते. लहान-लहान गोष्टींमुले चिडचिडेपणा वाढतो. थकवा येऊ शकतो.