हिवाळ्यात या पदार्थांमुळे वाढू शकते कोलेस्ट्रॉल, या गोष्टींची घ्या खास काळजी
Cholesterol : खाण्यापिण्याच्या अनियमित सवयी आणि चुकीच्या लाइफस्टाइल मुळे शरीरात खराब कोलेस्टेरॉल वाढते. यामुळे हृदयविकाराचा धोका खूप वाढतो. हिवाळ्यात कोलेस्ट्रॉलची समस्या टाळण्यासाठी काही पदार्थांपासून अंतर राखले पाहिजे.
1 / 4
हिवाळा सुरू झाला की आजारांचा धोकाही वाढतो. ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे त्यांना सर्दी, ताप, खोकला यासारख्या विषाणूजन्य संसर्गाचा त्रास सहन करावा लागतो. ज्या लोकांना कोलेस्ट्रॉलची समस्या आहे, त्यांनी हिवाळ्यात आरोग्याकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे.निरोगी राहण्यासाठी आपल्या शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल असणेही गरजेचे आहे. परंतु शरीरातील वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. विशेषतः, या स्थितीत हृदयाला सर्वात जास्त धोका असतो. (Photos : Freepik)
2 / 4
गोड पदार्थांपासून लांब रहा - जर तुम्ही खूप गोड खात असाल तर कोलेस्ट्रॉलची समस्या जाणवू शकते. थंडीच्या मोसमात लोकांना गाजराचा हलवा, मिठाई किंवा तिळाचे लाडू खायला आवडतात. पण ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉलची समस्या निर्माण होते.
3 / 4
फास्ट फूड - फास्ट फूडची क्रेझ शहरांबरोबरच गावातील लोकांमध्येही वाढताना दिसत आहे. पण ते खायला जेवढे चविष्ट असते, आरोग्यासाठी तेवढेच घातक असते. फास्ट फूडमुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढते, जे हृदयासाठी खूप धोकादायक आहे.
4 / 4
सिगारेट आणि दारू - हिवाळ्यात कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी दारू, सिगारेट यांसारख्या सवयींपासून दूर राहिले पाहिजे. सिगारेट आणि मद्यामुळे आरोग्य तर बिघडतेच पण कोलेस्ट्रॉलही वाढते. (डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)