या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे वारंवार होते डोकेदुखी, आजपासूनच घ्या काळजी
काही लोकं अनेकदा डोकेदुखीची तक्रार करतात. काहींना संध्याकाळी डोकेदुखीचा त्रास सुरू होतो तर काहींना सकाळी उठल्याबरोबर डोकेदुखी होते. मात्र हे नेमकं का होतं ? (Photos : Freepik)
-
-
कधीकधी डोकेदुखी इतकी वाढते की ती एका आजाराचे रूप घेते ज्याला आपण मायग्रेन म्हणतो. ही डोकेदुखी व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होऊ शकते. वास्तविक, व्हिटॅमिन डीचा मेंदूच्या ॲक्टिव्हिटी आणि न्यूरल फंक्शन वर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. त्यामुळे वेळोवेळी डोकेदुखीचा त्रास होऊ लागतो.
-
-
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, शरीरात सूज येते आणि न्यूरॉन्सचा त्रास होऊ लागतो. इतकेच नाही तर मायग्रेन आणि इतर प्रकारची डोकेदुखी देखील होते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे नायट्रिक ऑक्साईड वाढून मज्जातंतूंचा आवेग वाढतो आणि ते डोकेदुखीस कारणीभूत ठरते.
-
-
भारतात प्रत्येक चार प्रौढांपैकी एकाला उच्च रक्तदाब आहे. म्हणून, हे टाळण्यासाठी, आपल्या आहारात जास्तीत जास्त सुधारणा करा.शरीराला अन्नातून व्हिटॅमिन डीचा पुरवठा होत नसेल तर तुम्ही सप्लिमेंट्स देखील घेऊ शकता.
-
-
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेवर मात करण्यासाठी सकाळचा सूर्यप्रकाश घ्या. आणि निरोगी, पौष्टिक अन्न खाण्याचा प्रयत्न करा. तसेच आपल्या आहारात दुधाचा समावेश करा. ( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)