वाढलेले वजन
बदाम, अक्रोड यासारखे ड्रायफ्रुट्स आणि सफरचंद आपल्याला वजन कमी करण्यास मदत करते. यासाठी आपण नाश्त्यामध्ये सफरचंद किंवा त्याचा रस आणि ड्रायफ्रुट्स रोस्ट करून खाऊ शकता.
अंड्यात भरपूर प्रथिने असतात, जे वजन कमी करण्यास मदत करतात. तर याबरोबर आपण चहा कॉफीऐवजी ग्रीन टी घ्यावी. दोन्ही पदार्थ वजन नियंत्रणात ठेवतील.
इडली आणि सांबर हा नाश्ता प्रथिने समृद्ध आहे. याची चव वाढवण्यासाठी आणि अधिक पौष्टिक बनवण्यासाठी सांबरमध्ये बर्याच भाज्या घालू शकता.
व्हेजिटेबल सूप आणि ब्राऊन ब्रेड देखील वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि पौष्टिक पदार्थ आहेत. आपण कोणत्याही भाज्या उकडून त्याचे सूप बनवू शकता. त्यात काही ब्रेडचे तुकडे टाकून सूपची चव वाढवू शकता.