बॉलिवूडला रामराम करत सना खाननं सुरतचे व्यावसायिक अनस मुफ्ती यांच्यासोबत लग्न केलं. या दोघांच्या लग्नविषयी प्रचंड चर्चा झाली. यापूर्वी सनाच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
आता सनानं कश्मीरचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सना आता फिरण्यासाठी काश्मीरला गेली आहे. 'हेवन' असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.
लग्नानंतर सना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. तिनं तिचं इन्स्टाग्राम हॅन्डलचं नावही बदललं आहे.
गेल्या 20 नोव्हेंबरला सनानं लग्न केलं आहे. तेव्हापासूनच सना सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना तिच्या लग्नाची झलक देत आहे.तिनं पती अनस मुफ्तीसोबतचे सुद्धा फोटो शेअर केले आहेत. हे दोघंही लग्नानंतर अतिशय खूश दिसत आहे.
सना या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे.