Marathi News Photo gallery Himachal pradesh weather forecast Heavy rain update Monsoon fury in Himachal Pradesh, bridges, cars washed away in flash floods
हिमाचल प्रदेशात मान्सूनचा प्रकोप, अचानक आलेल्या पुरात पूल आणि गाड्या वाहून गेल्या
महेश घोलप |
Updated on: Jul 10, 2023 | 12:27 PM
पुलावर उभे असलेले लोक गाड्या वाहून जाताना पाहतात आहेत. कासोल मार्केट जवळील गटारे पाण्याने पुर्णपणे भरली आहेत. मागच्या काही दिवसांपुर्वी नाला पुर्णपणे रिकामा झाला होता.
1 / 8
हिमाचल प्रदेशमध्ये पावसाने भरपूर प्रमाणात नुकसान केले आहे. मागच्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे लोकांची मोठी अडचण झाली आहे.
2 / 8
तुनाग मंडी, कुल्लू हायवे परिसरातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. देशात उशिरा पाऊस दाखल झाला, परंतु पावसाने हिमाचलमध्ये हाहाकार माजवला आहे.
3 / 8
हिमाचलच्या मंडीतही पूर आणि पावसामुळे लोकांचे हाल होत असल्याचे व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. मंडीतील बंजार आणि बायपासला जोडणारा 40 वर्षे जुना पूल पुराच्या पाण्यासोबत वाहून गेला आहे.
4 / 8
बियास नदी तुडुंब भरली आहे, नदीला पाणी इतकं आहे की, पूलाच्या कठडा तुटला आहे. पुराच्या पाण्यातून पूलाचा काही भाग वाहून गेला आहे.
5 / 8
हिमाचलच्या चंबा परिसरातील सुध्दा काही फोटो व्हायरल झाले आहेत. पुराच्या पाण्यामुळे पूल खचला आहे.
6 / 8
दिसत असलेला परिसर चंब्याचा बकाणी परिसर आहे. जिथे रावी नदीवर पूल आहे, विशेष म्हणजे तो पूल दोन गावांना जोडतो. रावी नदीचा प्रवाह अतिशय वेगवान असल्यामुळे पूलावरुन पाणी वाहत आहे. पूलाचा एखादा भाग तुटल्यावर पुल कधीही वाहून जाऊ शकतो.
7 / 8
पुलावर उभे असलेले लोक गाड्या वाहून जाताना पाहतात आहेत. कासोल मार्केट जवळील गटारे पाण्याने पुर्णपणे भरली आहेत. मागच्या काही दिवसांपुर्वी नाला पुर्णपणे रिकामा झाला होता.
8 / 8
मागच्या दोन दिवसात इतका पाऊस झाला आहे की, अनेक वाहनं बुडाली आहेत.