अभिनेत्री हीना खान सध्या सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करताना दिसतेय. नुकतंच काही दिवसांपूर्वी तिच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर हीनाला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे कठीण काळात आपण आपल्या आईसोबत राहू शकत नाही तिला धीर देऊ शकत नाही अशा आशयाची एक पोस्ट तिनं शेअर केली होती. आता तिनं वडीलांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
हीना खाननं तिच्या वडिलांचे अनेक फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये तिचे वडील हिमवर्षावात सेल्फी घेताना दिसत आहे, तर दुसर्या फोटोत ते साहसी खेळण्याची तयारी करताना दिसत आहेत.
वडिलांच्या निधनानंतर हीना खाननं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. चाहत्यांनी दिलेल्या प्रेम आणि समर्थनाबद्दल त्यांचे आभार मानले. तिनं लिहिलं - यावेळी माझ्या आणि माझ्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या कठीण काळात तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल आणि समर्थनाबद्दल तुमचे आभार.
कुटुंबासोबत एक सुंदर फोटो शेअर करत हीनानं लिहिलं - मला माहित आहे की तुम्ही नेहमीच आमच्या मागे आहात. आपण सगळे नेहमीच एकत्र राहू.
हीनाने शेवटी खूप भावनिक फोटो शेअर केला. या फोटोत हीनाच्या वडिलांनी तिच्या खांद्यावर डोकं ठेवलंय.