महाराष्ट्रात होळीच्या निमित्ताने अनेक परंपरा जपल्या जातात. पण सांगलीतल्या मिरजे मध्ये एक अशी परंपरा जपली जाते. या दिवशी महिला त्यांच्या पुरुषांना काठीने मारतात.
गोसावी समाजात शिमगा म्हणजे होळीचा सण झाल्यावर दुसऱ्या दिवशी दुर्गामातेच्या मंदिरासमोर मिरजेतील गोसावी वस्तीत हा आगळा वेगळा खळ चालतो. साऊंड सिस्टीम लावून होळीच्या रंगाने नाहून निघाले स्त्रीया पुरुषांना मारताना दिसतात. अक्षय कुमारच्या टॉयलेट एक प्रेम कथा या चित्रपटामध्ये या प्रथेची एक झलक पाहायला मिळाली होती.
मिरजेतील गोसावी वस्तीमध्ये प्रमाणे एक अनोखी परंपरा आज जपली गेली आहे.पण कोरोना नंतर दोनवर्षानंतर हा खेळ मोठ्या उत्साहाने खेळला गेला. या प्रथेप्रमाणे गोसावी समाजातील महिला काठीने पुरुषांना झोडपून काढले.
या प्रथेप्रमाणे गोसावी समाजातील महिला काठीने पुरुषांना झोडपून काढतात. एका काठीला पैशे आणि भगवा ध्वज काठीला लावला जातो. त्याखाली पैशे बांधले जातात आणि या काठीला समाजातील महिलांचे संरक्षण असते. या काठीचे पैसे पळवण्याचे आव्हाहन पुरुषांना देण्यात येते. हे पैसे पळवण्यासाठी पुरुष काठीकडे निघाले तर स्त्रिया या पुरुषांना काठीने झोडपून काढतात.
वर्ष भर महिलाना आम्ही रागावतो. पण या खेळाचा निमित्ताने आमच्या बायका आम्हाला काठीने मारतात आणि आनंद घेत असतात. आम्ही ही आनंद घेत मार खातो. पण आमची ही परंपरा आहे. आजही आम्ही होळी अशीच साजरी करतो. अशी प्रतिक्रिया तेथील लोक देतात.