अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून हटके अंदाजात चाहत्यांशी कनेक्ट होत असते.
आता नुकतंच झी-टॉकीजच्या ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण ?’ या निमित्त या दशकाची फेवरेट कोण ठरणार यासाठी नामांकन जाहीर करण्यात आली आहेत.
याच निमित्तानं सोनालीनं काही फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केली आहेत.
या दशकातील तिचा शेवटचा सिनेमा म्हणजे ‘हिरकणी’. आता तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत.
सोनालीनं शेअर केलेल्या या फोटोंना चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळत आहे.