Marathi News Photo gallery Holi celebration at tuljabhavani temple Osmanabad learn about some of these famous temples dedicated to goddesses in marathi
महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीवर रंगांची उधळण, मंदिर रंगात न्हाऊन निघाले
होळीच्या पाचव्या दिवशी , चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या पाचव्या दिवशी रंगपंचमीचा सण साजरा केला जातो . होळीचा सण संपला असे मानले जाते.
1 / 5
होळीच्या पाचव्या दिवशी , चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या पाचव्या दिवशी रंगपंचमीचा सण साजरा केला जातो . होळीचा सण संपला असे मानले जाते. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, गुजरात इत्यादी सर्व राज्यांमध्ये तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
2 / 5
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आज रंगपंचमी सणं विविध रंगांची उधळण करीत साजरा करण्यात आला यावेळी तुळजाभवानी देवीला विविध रंग लावण्यात आले, विशेष म्हणजे तुळजाभवानी देवीला जो भाताचा नैवैद्य अर्पण करण्यात आला तोही विविध रंगाचा होता.
3 / 5
यावेळी देवीचे महंत, पुजारी यांनी तुळजाभवानी देवीला रंग लावत गाभाऱ्यात रंगाची उधळण केली त्यानंतर तुळजापूर शहरात रंगपंचमी साजरी करण्यात आली. या होळीत नैसर्गिक कोरडे रंग वापरण्यात आले.
4 / 5
यावेळी देवीला देखील रंग लावण्यात आला. संपूर्ण देवस्थान रंगामध्ये न्हाऊन निघालं होतं. असे मानले जाते की या दिवशी होळी साजरी केल्यानेदेवता प्रसन्न होतात आणि वातावरण सकारात्मक होते.महाराष्ट्रात या दिवशी पुरणपोळी बनवली जाते. खासकरुन मासेमारी करणाऱ्यांच्या वस्तीत या दिवशी होळी साजरी केली जाते.
5 / 5
नाचणे-गाणे अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. काही ठिकाणी माठ फोडण्याच्या कार्यक्रमाचंही आयोजन केलं जातं. मासेमारी करणारा समाजात हा दिवस लग्न ठरवण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो.