Honda कंपनीकडून मोठा निर्णय, तीन इलेक्ट्रिक एसयुव्हीबाबत उचललं असं पाऊल
Honda Electric SUV : होंडा कंपनीच्या इलेक्ट्रिक कारबाबत गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चा रंगली होती. अखेर कंपनीने ऑटो शांघाईत त्याची एक झलक दाखवली. चला जाणून नेमकं काय आहे ते..
1 / 5
होंडा कंपनीने तीन इलेक्ट्रिक एसयुव्ही सादर करत कारप्रेमींना भेट दिली आहे. जापानी ऑटो कंपनीने चीनच्या शांघाईमध्ये सुरु असलेल्या ऑटो शोमध्ये तीन इलेक्ट्रिक कार सादर केल्या. फ्यूचरिस्टिक डिझाईनसह या एसयुव्ही पुढच्या वर्षी लाँच होणार आहेत. (Photo: Honda)
2 / 5
ऑटो शोमध्ये कंपनीने इलेक्ट्रिक एसयुव्हीच्या दोन प्रोटोटाइप आणि एक कॉन्सेप्ट सादर केली. e:NP2 प्रोटोटाइप, e:NS2 प्रोटोटाइप आणि e:N SUV कॉन्सेप्ट कारचा समावेश आहे. (Photo: Honda)
3 / 5
Honda e:NP2: ही गाडी आकर्षक लूक आणि स्टाईलसह सादर केली गेली. कंपनीच्या मते, Honda e:NP2 गाडी ड्रायव्हरला चांगला ड्राईव्ह अनुभव देईल. तसेच आत एकदम अडव्हॉन्स फीचर्स असतील. (Photo: Honda)
4 / 5
Honda e:NS2 : होंडाच्या प्रोटोटाइप कारमध्ये होंडा कनेक्ट 4.0 सारखे अडव्हॉन्स फीचर्स असतील. दोन्ही एसयुव्हीची डिझाईन एसयुव्ही स्टाईलमध्ये असेल. या गाडीला हलका सेडान टच आहे. (Photo: Honda)
5 / 5
Honda e:N SUV : होंडा इलेक्ट्रिक एसयुव्हीचं कॉन्सेप्ट e:N तिसरा सेट आहे. हे पहिलं मॉडेल असं आहे की e:N Architecture W डेव्हलप केलं आहे. या गाडीचं प्रोडक्शन अजून सुरु केलेलं नाही. (Photo: Honda)