अभिनेत्री काजल अग्रवाल आणि गौतम किचलू या दोघांनी 30 ऑक्टोबरला लग्न गाठ बांधली, सध्या हे दोघं मालदीवमध्ये धमाल करत आहेत.
लग्नाच्या फोटोपासून ते हनिमूनपर्यंत काजल तिच्या चाहत्यांना हॅपीनेस गोल्स देत आहे.
गेल्या काही दिवसांपासून ती पती गौतमसोबत मालदीवमध्ये आहे. ट्रीपचे जबरदस्त फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
आता तिनं 'स्टोरिज ऑफ गौतम किचलू' या सीरिजमधील काही फोटो शेअर केले आहेत.
महत्वाचं म्हणजे हे फोटो गौतमनं काढले आहेत.
सोबतच गौतमसुद्धा धमाल करताना दिसतोय. त्यानं स्विमिंग करतानाचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.