Marathi News Photo gallery Honoring My Marathi at Maharashtra Legislature Secretariat on the occasion of Marathi Language Pride Day
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र विधीमंडळ सचिवालयात माय मराठीचा गौरव
महेश घोलप |
Updated on: Feb 28, 2023 | 11:26 AM
महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, दीपक केसरकर, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
1 / 6
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र विधीमंडळ सचिवालयाच्या वतीने आयोजित 'साहित्याची ज्ञानयात्रा' या कार्यक्रमात माय मराठीचा गौरव करण्यात करण्यात आला.
2 / 6
महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, दीपक केसरकर, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
3 / 6
कुसुमाग्रज, वि. स. खांडेकर, विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे अशा चारही ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्यांच्या साहित्यावर आधारित ही 'साहित्याची ज्ञानयात्रा' आज मराठी भाषा गौरव दिनी अनुभवता येणे, हा श्रवणानंद अनोखा आणि ज्ञानपर्वणीच! असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे.
4 / 6
ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदान मागितले आणि तोच विचार मराठी साहित्यात प्रवाहित झाला. मराठी ही प्राचीन भाषा आहे. मराठीने अनेक आव्हानं पेलली आणि त्यातून अधिक निखळत गेली, बहरत गेली. त्यामुळे कितीही संकटं आली तरी लढण्याचे बळ मराठीकडे आहे असं फडणवीस यांनी फेसबुकच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
5 / 6
भाषेशी नव्या पिढीचा संपर्क जणू तुटत चालला होता. पण आता मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी प्रादेशिक भाषांमध्ये व्यावसायिक शिक्षणाचे दालन निर्माण करून दिले. जर्मनीत चांगले अभियंते आहेत, जपानमध्ये सर्वात चांगले इलेक्ट्रॉनिक्स तज्ज्ञ आहेत, पण त्यांनी ते शिक्षण त्यांच्या स्थानिक भाषेतून घेतले.
6 / 6
मराठीतून व्यावसायिक शिक्षणामुळे मोठे बदल सहज घडविता येणार आहेत. विधिमंडळ, महापौर, अर्थसंकल्प, दूरदर्शन हे सारे शब्द वीर सावरकर यांनी मराठीला दिले. त्यांनी मराठीच्या शुद्धलेखनावर आणि वापर-आग्रहावर मोठा भर दिला. हीच दृष्टी मराठीला प्रेरक ठरणार आहे.