अभिनेत्री आलिया भट्ट गेल्या काहीदिवसापासून सातत्याने चर्चेत असलेली दिसून आली आहे. तिने नुकतेच आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. अवघ्या काही तासांत त्याच्या या फोटोंना 21 लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत.
काही दिवसांपूर्वीच आलिया भट्टने नुकतीच तिच्या प्रेग्नेंसी न्यूज तिच्या चाहत्यांच्या सोबत शेअर केली. तेव्हापासून चाहते तिच्या सोशल मीडियावरील प्रत्येक अपडेटवर लक्ष ठेवून आहेत.
आलिया भट्टने दोन महिन्यापूर्वी अभिनेता रणबीर कपूर सोबत कुटुंबीय व मोजक्याच पाहुण्याच्या उपस्थितीतीत आरके हाऊसमध्ये लग्न केले आहे.
सोशल मीडिया हँडलवर फोटो टाकत ती चाहत्यांना तिच्या विषयी अपडेट देताना दिसून येते. या फोटोंमध्ये आलिया गुलाबी रंगाच्या कट-आउट मिनी ड्रेस घातला आहे मध्ये दिसत आहे या लुक सोबत तिने लाईटमेकअप केला आहे.
चित्रपट निर्माता करण जोहर त्याच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोचा सातवा सीझन घेऊन येणार आहे. त्याचा एक प्रोमोही रिलीज झाला आहे. या चॅट प्रोमोमध्ये रणवीर सिंग आणि आलिया भट्ट दिसले होते आणि आलियाने 'कॉफी विथ करण 7'च्या प्रोमोमध्ये हाच ड्रेस परिधान केला होता.