Vice President Election : उपराष्ट्रपती पदाची निवडणूक कशी होते ? जाणून घ्या फोटो स्टोरीतून
प्रकारे दोन्ही सभागृहातील 790 मतदार उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत सहभागी होतात. यामध्ये राज्यसभेचे 233 निर्वाचित सदस्य आणि 12 नामनिर्देशित सदस्यांव्यतिरिक्त लोकसभेचे 543 निर्वाचित सदस्य आणि दोन नामनिर्देशित सदस्य मतदान करतात.
1 / 5
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची अधिसूचना 5 जुलै रोजी जारी करण्यात आली आहे. यासाठी 19 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.
आयोगाने निवडणुकीसाठी 6 ऑगस्ट ही तारीख निश्चित केली आहे. देशाचे विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 11 ऑगस्ट रोजी संपत आहे.
2 / 5
संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य मत: संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांचा समावेश असलेल्या इलेक्टोरल कॉलेजद्वारे समानुपातिक प्रतिनिधित्व प्रणालीद्वारे उपराष्ट्रपतीची निवड केली जाते.
3 / 5
संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य यात सहभागी होतात. प्रत्येक सदस्याला एकच मत देत येते. राष्ट्रपती निवडणुकीत निवडून आलेल्या खासदारांसोबत आमदारही मतदान करतात, पण उपराष्ट्रपती निवडणुकीत फक्त लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्यच मतदान करू शकतात.
4 / 5
उपराष्ट्रपती निवडणुकीत नामनिर्देशित खासदारही मतदान करू शकतात: नामनिर्देशित खासदार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करू शकत नाहीत, परंतु उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत असे होत नाही. असे सदस्य उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही मतदान करू शकतात.
5 / 5
अशा प्रकारे दोन्ही सभागृहातील 790 मतदार उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत सहभागी होतात. यामध्ये राज्यसभेचे 233 निर्वाचित सदस्य आणि 12 नामनिर्देशित सदस्यांव्यतिरिक्त लोकसभेचे 543 निर्वाचित सदस्य आणि दोन नामनिर्देशित सदस्य मतदान करतात. अशा प्रकारे त्यांची एकूण संख्या 790 होईल.