अंजीर खाण्याचे शरीराला अनेक फायदे मिळतात. दिवसभरात 2-3 अंजीर खाण खूप उपयुक्त ठरू शकते. त्यातील फायबरमुळे पाचनतंत्र मजबूत होते. 2-3 अंजीरांमध्ये सुमारे 10-15 ग्रॅम फायबर आढळते. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होण्यास मदत होते आणि पोट स्वच्छ राहते. तसेच त्यामध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, लोह, पोटॅशिअम इत्यादी अनेक महत्त्वपूर्ण खनिजे असतात. ( Photos : Freepik)
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी भिजवलेले अंजीर खाणे खूप फायदेशीर आहे. अंजीरामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते.
अंजीरामध्ये असलेले पोटॅशिअम हे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. अंजीरमध्ये पोटॅशियमचे प्रमाण इतर सर्व सुक्या मेव्यांपेक्षा जास्त असते.
अंजीरामध्ये जास्त प्रमाणात फायबर आढळते जे पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे. अंजीराचे नियमित सेवन केल्याने पचनक्रिया मजबूत आणि निरोगी राहते.
पण अंजीर जास्त प्रमाणात खाल्ल्याने काही दुष्परिणाम देखील होऊ शकतात. जास्त प्रमाणात अंजीर खाल्ल्याने गॅस, ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. ( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)