1 - शेरा - सलमान खान याचा अत्यंत विश्वासू अंगरक्षक आहे.अनेकदा कलाकारांना त्यांच्या घरच्याहून अधिक त्यांचे अंगरक्षक अधिक ओळखत असतात असे म्हटले जाते. तब्बल 29 वर्ष शेरा सलमानचे संरक्षण पाहात असून त्यासाठी त्याला महिन्याला 15 लाख म्हणजे वार्षिक 2 कोटी रुपये वेतन मिळते.
2 - रवी सिंह - शाहरुख खान याचा खाजगी बॉडीगार्ड असलेला रवी सिंह शाहरुख याच्या संपूर्ण फॅमिली संरक्षण करीत असतो. त्यासाठी त्या वार्षिक 2.7 कोटीचे पॅकेज मिळते.
3. जितेंद्र शिंदे - बिग बि अमिताभ बच्चन याच्या संरक्षणाची जबाबदारी साल ऑगस्ट 2021 पर्यंत जितेंद्र शिंदे यांच्यावर होती. परंतू पोलीस सेवेत असूनही त्यांचे वेतन 1.5 कोटी असल्याचे उघड झाल्याने त्यांच्यावर 2O22 मध्ये पोलिस दलाने कारवाई केली. त्याने साल 2015 पासून त्यांच्याकडे नोकरी करायला सुरुवात केली होती.
4 - श्रेयस थेले - खिलाडीकुमार अक्षय कुमार याच्या संरक्षणासाठी श्रेयस थेले याचे वेतना पोटी वर्षाचे 1.2 कोटीची पॅकेज मिळते.अक्षयचा मुलगा आरव याचे संरक्षण देखील तोच करतो
5 -युवराज घोरपडे - हा आमीर खानचा विश्वासू अंगरक्षक आहे.युवराज याला आमीर खान सारख्या बिगेस्ट फॅन फॉलोअईंग असणाऱ्या स्टारचे संरक्षण करायचे असल्याने त्याचे वेतन 2 कोटी आहे.
6 - जलाल - हा दीपिका पादूकोण हीचा बॉडीगार्ड असून ती नेहमी जलाल याच्या शिवाय बाहेर पडत नाही, तो तिच्या मागे सावली सारखा असतो. त्याला वर्षाला 1.2 कोटी वेतन आहे
7 - प्रकाश सिंह (सोनू ) हा अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा अंगरक्षक आहे. परंतू तो विराट आणि वामिका यांची सुरक्षा पाहातो.त्याला दरवर्षी 1.2 कोटीचे पॅकेज मिळते
8 - राम सिंह हा प्रोसेनजीत चटर्जी यांचा बॉडीगार्ड म्हणून अनेक वर्षे कार्यरत आहे.त्याने कौशिक गांगुली यांच्या ज्येष्टोपूत्र या चित्रपटात कामही केले आहे. राम सिंह याला किती सॅलरी मिळते हे जाहीर करण्यात आलेले नाही.टॉलीवूड स्टारच्या या अंगरक्षकाची कमाई मोठी असल्याचे म्हटले जाते.