संग्रहित.
यामुळेच सरकारने एक मोबाईल अॅप सुरु केले आहे. यात तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता.
केंद्रीय ग्राहक आणि खाद्य मंत्रालयाने (Union Ministry of Consumer and Food) BIS - केअर मोबाईल अॅप सुरु केले आहे. या अॅपच्या मदतीने तुम्ही खरेदी केलेले सोने किती शुद्ध आहे, याची माहिती सहज मिळू शकते.
तसेच जर ग्राहकाला भेसळयुक्त सोनं मिळालं तर तुम्ही BIS - केअर अॅपवर तक्रार नोंदवू शकता. याशिवाय या अॅपवर लायसन्स, नोंदणी आणि हॉलमार्कनंबर याविषयीही तक्रार दाखल करता येते.
दरम्यान नुकतंच सरकारने देशभरात सोन्याचे हॉलमार्किंग अनिवार्य केले आहे. येत्या 15 जून 2021 पासून सोन्याचे दागिने हॉलमार्कशिवाय विकल्यास त्या दागिन्याच्या व्यापाऱ्यांना बीआयएस कायद्यातील तरतुदींनुसार दंड भरावा लागेल.
सोने तारण कर्ज
gold
हॉलमार्किंगमध्ये बीआयएसची खूण, 22 कॅरेट शुद्धता, मूल्यांकन केंद्राची ओळख आणि दागिन्यांच्या व्यवसायाचे ओळख चिन्ह यांचा समावेश असतो.