घरातील माशांना वैतागला आहात, हे उपाय करा अन् कायमची मिळवा सुटका

| Updated on: Jul 17, 2023 | 9:12 PM

जसा पावसाळा सुरू झालाय तेव्हापासून प्रत्येक घरात माशा आलेल्या दिसत आहेत. या माशांमुळे चिडचिड होते इतकंच नाहीतर त्यामुळे तुमचं आरोग्यही बिघडण्याचा धोका जास्त असतो. घरी आमंत्रण न देता आलेल्या माशांना घरातून बाहेर काढायचं असेल तर काही सोपे आणि साधे घरगुती उपाय आहेत. या उपायांचा वापर करून तुम्ही घरातील माशांना कायमचं घरातून हाकलून लावू शकता.

1 / 5
माशांना घरातून बाहेर काढण्यासाठी स्पेच्या बाटलीममध्ये एक ग्लास पाणी भरून घ्या. त्यामध्ये चार ते पाच मोठ्या मीठाचे खडे टाका.  ते पाणी जिथे माशा आहेत तिथे शिंपडा त्यानंतर तिथे माशा बसणार नाहीत.

2 / 5
पूदिना आणि तुळशीची पाने घ्या, त्या पानांची पेस्ट करा आणि ते पाण्यात मिक्स करा. पाण्याचं मिश्रण झाल्यावर ते पाणी जिथे माशा बसतात तिथे टाका.

3 / 5
एक ग्लास दूध, एक चमचा काळी मिरी आणि तीन-चार चमचे साखर मिक्स करा.

4 / 5
. हे सर्व एकत्र करून ते पाणी जिथे माशा असतील तिथे  भरून ठेवा. माशा याकडे जास्त आकर्षित होतात आणि पाण्यात बुडतात.

5 / 5
घरातील फरशीवर चिकट आणि गोड पदार्थ जमीनीवर पडले तर लगेच पाण्यात फिनाइल टाकून ते साफ करा. कारण माशा आणि मुंग्या जास्त आकर्षित होत असतात.