हल्ली आपण प्रत्येक जण इन्स्टाग्रामचा वापर करत असतो. जर तुम्ही इन्स्टाग्राम वापरत असाल आणि तुमचे फॉलोअर्स वाढत नसतील, तर मग ही माहिती तुमच्यासाठी आहे.
तुमचे फॉलोअर्स आणि व्ह्यूज वाढवायचे असतील तर तुमच्या खात्यावर कंटेंट पोस्ट करण्यापूर्वी या तीन चुका करणे टाळा, तर तुमचे युजर्स लगेचच वाढतील.
इन्स्टाग्रामवर कंटेंट पोस्ट करताना बहुतेक लोक काही चुका करतात. त्यामुळे त्यांचे इंस्टाग्राम फॉलोअर्स वाढण्याऐवजी कमी होऊ लागतात. जर तुम्ही इंस्टाग्रामवर या तीन चुका करत असाल, तर ते आताच थांबवा. जेणेकरुन तुमचे फॉलोअर्स वाढू शकतील.
रील किंवा पोस्टची गुणवत्ता: बरेच लोक रील बनवतात, पण त्यांच्या गुणवत्तेकडे लक्ष देत नाहीत. आजकाल, लोक उच्च दर्जाचे कंटेंट पाहणे पसंत करतात. त्यामुळे तुम्हीही रील बनवताना त्यातील ऑडिओ स्पष्ट असावा. जर तुम्ही व्हिज्युअल आणि ऑडिओ गुणवत्तेकडे दुर्लक्ष केले तर लोकांना तुमचा कंटेंट आवडत नाही.
रील्स जास्त लांब करू नका: बरेच लोक मोठ्या रील्स बनवतात. पण हे पाहण्यासाठी लोक कंटाळतात. काही लोक फक्त अर्धवट रील पाहतात आणि सोडून देतात. यामुळे तुम्ही रील बनवताना तो कमी वेळेचा आणि चांगला संदेश देणारा बनवा. शक्यतो फक्त ३० सेकंद किंवा ४५ सेकंदांचे रील अपलोड करा.
हॅशटॅग आणि फिल्टरचा वापर: अनावश्यक हॅशटॅग वापरणे थांबवा. गरजेनुसार आणि व्हिडीओनुसारच हॅशटॅग वापरा. जर व्हिडीओवर फिल्टर लावता येत असेल तर त्याचा वापर करा. यासोबतच, तुमची पोस्ट किंवा व्हिडीओ तुमच्या मित्रांना टॅग करा, जेणेकरुन त्यांचे फॉलोअर्स देखील तुमचा कंटेंट पाहू शकतील.
सकाळी 6 ते 9, दुपारी 12 ते 3 आणि संध्याकाळी 6 ते 9 या वेळेत रील्स अपलोड करा. या काळात रील्स पाहणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असते.
कोणतीही पोस्ट करताना वेळेचे पालन करा. तुम्ही रील्स शेड्यूलही करु शकता. या टिप्स फॉलो केल्यास तुमचे इन्स्टाग्रामचे फॉलोअर्स नक्कीच वाढू शकतात.