बदनामीचं सोडा अशी दुसरी Bank जगात दाखवा, प्रत्येकाला वाटतं माझं खातं असाव, Swiss बँकेत अकाऊंट कसं उघडणार?
Swiss Bank Account : अमेरिकन रिसर्च फर्म हिंडनबर्गने अदानी समूहावर पुन्हा एकदा आरोपांची राळ उडवली आहे. स्विस बँकेत अदानी यांची 31 कोटी डॉलरची रक्कम जमा आहे, असा आरोप करण्यात आला आहे. ही बँक बदनाम झाली असली तरी जगभरातील अनेक बड्या नेते, उद्योजकांची खाती आहेत.
1 / 7
अमेरिकन रिसर्च फर्म हिंडनबर्गने अदानी समूहाविरोधात पुन्हा आरोपांची राळ उडवली आहे. स्विस बँकेने अदानी समूहाची खाती गोठवल्याचा दावा हिंडनबर्गने केला आहे. या बँकेत त्यांचे 31 कोटी डॉलर जमा आहेत, असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे ही बँक चर्चेत आली आहे. काळा पैसा जमा करण्यासाठी राजकीय नेते, उद्योजक या बँकेचा वापर करत असल्याचा आरोप करण्यात येतो.
2 / 7
1713 मध्ये पहिल्यांदा स्वित्झर्लंडची पहिली बँक स्थापन झाली. तर आताची यूनियन बँक ऑफ स्वित्झर्लंड 1998 मध्ये अस्तित्वात आली. जुरिक आणि बसेलमध्ये या बँकेचे मुख्यालय आहे. कडक नियम आणि गोपिनियतेसाठी ही बँक ओळखल्या जाते.
3 / 7
धनिक काळे पैसे येथे ठेवतात म्हणून ही बँक प्रसिद्ध नाही. तर खातेदारांच्या गोपनियतेसाठी पण ही बँक ओळखल्या जाते. अनेक दिग्गजांचा पैसा या बँकेत सुरक्षित आहे. गोपनियतेमुळे अनेक नेते, राजकारणी, व्यावसायिकांचे येथे खाते आहे.
4 / 7
2017 मध्ये या बँकेने त्यांच्या नियमात थोडी शिथिलता आणली आहे. त्यानुसार ज्या देशांशी करार या आहे, त्यांना ही बँक संशयित खात्याविषयी, संबंधित व्यक्तीविषयी माहिती पुरवते.
5 / 7
या बँकेतील खातेदारांना एक सुरक्षित क्रमांक देण्यात येतो. त्याआधारेच बँकेचा खातेदार कोण याची माहिती मिळते. बँकेच्या खातेदाराचे नाव काय याची माहिती सुद्धा बंक कर्मचाऱ्याला नसते. या खातेदाराचे नाव आणि त्याच्या खात्याची माहिती केवळ काही अधिकाऱ्यांना असते.
6 / 7
या बँकेत खाते उघडण्याची प्रक्रिया सोपी आहे. तुम्ही घरबसल्या ऑनलाईन या बँकेत खाते उघडू शकता. त्यासाठी पासपोर्ट क्रमांक, संपत्तीविषयीची कागदपत्रं मागण्यात येतात. तुम्ही जी रक्कम जमा करत आहात, त्याच्या उत्पन्नाचा स्त्रोत याची माहिती द्यावी लागते.
7 / 7
स्विस बँकेत कमीत कमी 1 लाख डॉलर म्हणजे 75 लाख रुपयांची शिल्लक ठेवावी लागते. तर खाते मेंटनन्ससाठी 300 डॉलर वा 22 हजार रुपये शुल्क अदा करावे लागते.