हिवाळ्यात बरेच लोक कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत बाहेर फिरायला जायचा प्लॅन करतात. मात्र या ऋतूमध्ये बाहेर फिरताना , निसर्गाचा आनंद लुटताना स्वत:ची काळजी घेणेही तितकेच महत्वाचे ठरते अन्यथा आजारी पडून संपूर्ण ट्रीप खराब होऊ शकते. त्यामुळे बाहेर फिरायला जाल तर आधी स्वत:ची नीट काळजी घ्या, त्यासाठी काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे व या टिप्स फॉलो करा.
गरम पाणी प्यावे - जर तुम्ही थंडीच्या मोसमात प्रवास करण्याचा विचार करत असाल तर गरम पाण्याची बाटली सोबत ठेवा. या ऋतूत गार पाणी पिणे टाळावे. अन्यथा सर्दी आणि घसा दुखण्याची समस्या उद्भवू शकते.
थर्मल कॅरी करावेत - हिवाळ्यात थर्मल (कपडे) तुमच्यासोबत आठवणीने न्या. थर्मलचे किमान 2 ते 3 जोड तुमच्यासोबत ठेवा. याशिवाय पफर जॅकेट आणि लोकरीचे कपडेही सोबत ठेवावेत. यामुळे थंडीपासून बचाव होईल व उबदार वाटेल.
वॉटरप्रूफ बूट - हिमाच्छादित जागी किंवा थंड प्रदेशात शूज लवकर ओले होतात. यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. म्हणूनच तुमच्यासोबत वॉटरप्रूफ बूट घेऊन जाणे महत्त्वाचे ठरते.
कान व डोकं नीट झाकावे - बर्फाळ प्रदेशात किंवा थंड जागी गार वाऱ्यामुळे त्रास होऊ शकतो. अनेक लोक कान व डोकं उघडं ठेवतात, पण त्यामुळे आजारी पडण्याचा धोका असतो. त्यामुळेच कान व डोकं नीट झाकलं जाईल अशी टोपी घालावी.