‘दूर्वा’, ‘फुलपाखरू’ यासारख्या सुपरहिट मालिका, ‘सिंगिंग स्टार’सारखा रिअॅलिटी शो, ‘स्ट्रॉबेरी शेक’सारखी शॉर्टफिल्म आणि ‘दादा एक गुड न्यूज आहे’, असं अफलातून काम करत अभिनेत्री ऋता दुर्गुळेनं रसिक प्रेक्षकांच्या मनात राज्य केलंय.
आता ऋता लवकरच नव्या प्रोजेक्टची घोषणा करणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार ऋतानं आता ती 'अदिती'ची भूमिका साकारणार असल्याचं सोशल मीडियावरुन सांगितलं आहे. सोबतच तिनं ‘स्ट्रॉबेरी शेक’चे दिग्दर्शक शोनील यल्लत्तीकर यांचे सोशल मीडियावर आभारसुद्धा मानले आहेत.
ती ही 'अदिती'ची भूमिका साकारणार आहे हे खरंय! मात्र, तिनं या बाबतीत अधिक माहिती दिलेली नाहीये.
या सेटवरचे काही फोटो शेअर करण्यात येत आहेत. ज्यामध्ये ऋता दुर्गुळे, दिग्दर्शक शोनील यल्लत्तीकर, DOP लौकिक जोशी, प्रोडक्शन डिझाइनर कमलेश कळसुलकर आणि संगीत दिग्दर्शक निषाद गोलांबरे म्हणजेच ‘स्ट्रॉबेरी शेक’ची संपूर्ण टीम दिसतेय.
त्यामुळे आता ही संपूर्ण टीम काहीतरी भन्नाट घेऊन येणार हे नक्की आहे.
खरंतर या नव्या सेटवर स्ट्रॉबेरी शेकच्या संपूर्ण टीमचं रियुनियनच झालं असल्याचं दिसत आहे.