Photos : दिवाळीला फटाके खरेदीसाठी मुंबईत गर्दी, तर दिल्लीत फटाकेबंदीने व्यावसायिक आक्रमक
दिवाळीला फटाके खरेदी करण्यासाठी मुंबईत मोठी गर्दी उसळली आहे. दुसरीकडे दिल्लीत फटाकेबंदीने व्यावसायिक आक्रमक झालेत.
-
-
मुंबईत दिवाळीसाठी फटाके खरेदी करणाऱ्यांची गर्दी उसळली आहे.
-
-
मुंबईतील फटाक्यांवरी निर्बंधांविषयी बोलताना फटाके व्यावसायिक मिनेश मेहता यांनी हे निर्बंध चांगले असल्याचं म्हटलं आहे.
-
-
तसेच सरकारच्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा नागरिकांनी चुकीचा अर्थ घेतल्याचं म्हटलं.
-
-
बीएमसीने सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी घातली आहे, अशी माहिती फटाके व्यावसायिकांनी दिली. तसेच हा निर्णय आमच्यासाठी चांगलाच असल्याचं म्हटलं.
-
-
दुसरीकडे दिल्लीत वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने सर्वच प्रकारच्या फटाक्यांवर बंदी घातली आहे.
-
-
या फटाके बंदीला फटाके व्यावसायिकांनी विरोध केला आहे. तसेच दिवाळीपर्यंत किमान ग्रीन फटाके तरी फोडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.
-
-
आधी ग्रीन फटाके फोडण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, अचानकपणे केलेल्या सरसकट बंदीमुळे आमचं नुकसान होत आहे.
-
-
नाशिकमध्ये फटाक्यांच्या किमती वाढल्या आहेत.
-
-
दिल्ली सरकारच्या या निर्णायाविरोधात काही व्यापाऱ्यांनी आंदोलन करणार असल्याचंही म्हटलं आहे.