Marathi News Photo gallery Hunar Haat Anurag Thakur inaugurates 40th Hunar Haat at BKC Mumbai What are the features of Hunnar Haat?
मुंबईतील बीकेसीत 40 व्या ‘हुनर हाट’चं उद्घाटन, ‘भेट द्या आणि एक भारत श्रेष्ठ भारत संकल्पनेचा अनुभव घ्या’
देशातील 'स्वदेशी' आणि 'व्होकल फॉर लोकल'च्या व्यापक सामर्थ्याचा अनुभव आणि कला आणि कौशल्य यांच्या प्रदर्शनाची संधी देणाऱ्या हुनर हाटची 40वी आवृत्ती 16 ते 27 एप्रिल दरम्यान मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला संकुलात सुरु आहे.
1 / 6
देशाच्या प्रत्येक भागातील 'स्वदेशी' आणि 'व्होकल फॉर लोकल'च्या व्यापक सामर्थ्याचा अनुभव आणि कला आणि कौशल्य यांच्या प्रदर्शनाची संधी देणाऱ्या हुनर हाटची 40वी आवृत्ती 16 ते 27 एप्रिल दरम्यान मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला संकुलात सुरु आहे. या 'हुनर हाट' चे औपचारिक उद्घाटन आज केंद्रीय माहिती आणि प्रसारण, मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
2 / 6
या प्रदर्शनात, 31 पेक्षा अधिक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील जवळपास 1 हजार विणकर, शिल्पकार, कारागीर आपली हस्तनिर्मित दुर्मिळ स्वदेशी उत्पादने घेऊन सहभागी झालेले आहेत. ज्यात मोठ्या संख्येने महिला कारागीर आणि शिल्पकारांचा समावेश आहे, असे ठाकूर म्हणाले.
3 / 6
हुनर हाटला भेट द्या आणि एक भारत श्रेष्ठ भारत संकल्पनेचा अनुभव घ्या, असे केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री आणि राज्यसभेचे उपनेते मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले. या ठिकाणी सादर करण्यात आलेली उत्पादने पाहून आपल्या देशातील काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या विविध कलाकारांच्या कौशल्यांचा अंदाज येईल असे त्यांनी सांगितले.
4 / 6
'हुनर हाट' हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'व्होकल फॉर लोकल' आणि 'स्वदेशीतून स्वावलंबन' या संकल्पनांचा सशक्त, यशस्वी प्रकल्प आहे. या प्रदर्शनात, 31 पेक्षा अधिक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील जवळपास 1 हजार विणकर, शिल्पकार, कारागीर आपली हस्तनिर्मित दुर्मिळ स्वदेशी उत्पादने घेऊन सहभागी झालेले आहेत. ज्यात मोठ्या संख्येने महिला कारागीर आणि शिल्पकारांचा समावेश आहे.
5 / 6
मुंबई ‘हुनर हाट’ मध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, दिल्ली, नागालँड, मध्य प्रदेश, मणिपुर, बिहार, आंध्रप्रदेश, झारखंड, गोवा, पंजाब, लडाख, कर्नाटक, गुजरात, हरियाणा, जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, छत्तीसगड, तामिळनाडू, केरळसह देशातील प्रत्येक क्षेत्रातून नावाजलेले कारागीर आपली सुंदर हस्तनिर्मित दुर्मिळ उत्पादने घेऊन आले आहेत.
6 / 6
देशाच्या विविध भागांतील पारंपारिक पदार्थांचा आस्वाद घेण्याची सोय ‘हुनर हाट’ मधील फूड कोर्टच्या माध्यमातून केलं आहे. याशिवाय, ‘मेरा गांव मेरा देश’, ‘विश्वकर्मा वाटिका’, दररोज होणारे सर्कशीचे खेळ, ‘महाभारता’चे सादरीकरण, प्रसिद्ध कलावंतांच्या गीत-संगीताचे कार्यक्रम, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पॅव्हेलीयन, सेल्फी पॉइंट इत्यादी, मुंबई इथे आयोजित ‘हुनर हाट’ चे मुख्य आकर्षण आहेत.