जर तुम्हाला एखाद्या कार्यक्रमासाठी ट्रेडिशनल वेअर लूक करायचा असेल तर तुम्ही अभिनेत्री श्वेता तिवारीकडून नक्कीच प्रेरणा घेऊ शकता. श्वेता तिवारीचा कोणता साडीतला लूक रिक्रिएट करता येईल ते जाणून घेऊया.
रेड साडीचा लुक - श्वेता तिवारीने या लूकमध्ये रेड कलरची साडी घातली आहे. श्वेताने प्लेन साडीसोबत ऑफ शोल्डर ब्लाउज सुंदररित्या कॅरी केला आहे. त्यासोबतच केस मोकळे ठेवण्यात आले असून लूक पूर्ण करण्यासाठी नॅचरल म्हणजेच कमीत कमी मेकअप करण्यात आला आहे.
गुलाबी रंगाची साडी - श्वेता तिवारीने या फोटोत फिकट गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. त्याच्यासोबत मॅचिंग ब्लाउज घातला आहे. गडद लिपस्टिकसोबत तिने हा लूक पूर्ण केला.
फ्लोरल साडी - श्वेता तिवारीच्या या फ्लोरल साडीचा लूकही तुम्ही रिक्रिएट करू शकता. श्वेता तिवारीने या साडीसोबत लाल रंगाचा प्लेन सिंपल ब्लाउज कॅरी केला आहे.
लाइनिंग साडी - श्वेता तिवारी या लाइनिंग साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तुम्ही हा लुक कोणत्याही पार्टीसाठी रीक्रिएट करू शकता. या साडीसोबत श्वेताने डिझायनर ब्लाउज स्टाइल केला आहे.