सध्या सूर्यनारायणाच्या प्रकोपामुळे अंगाची लाहीलाही होतेय आहे. सकाळी 10 नंतर ते दुपारी तीन ते साडेतीन पर्यंत शरीरातून घामाच्या धारा वाहू लागतात. अशा गरम्यात काही वेळ एसीची थंड हवा म्हणजे विषयच नाही. प्रत्येकाला एसीची थंड हवा हवीहवीशी वाटते. मात्र ही एसीची हवा आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. एसीच्या गारव्यामुळे काय आणि कोणते आजार होऊ शकतात, हे आपण जाणून घेऊयात.
एअर कंडिशनरच्या वापरामुळे डोळ्यांना कोरडेपणा येऊ शकतो. यामुळे आरोग्याची हानी होऊ शकते आणि डोळ्यांना त्रास होऊ शकतो, ज्यामुळे विविध त्रासाचा सामना करावा लागू शकतो.
एसीच्या थंड हवेमुळे शरीर थंड होतं. त्यामुळे डोकेदुखी आणि भोवळ येण्याची शक्यता अधिक असते.
अधिक वेळ एसीत राहिल्याने श्वसनाच्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे विविध आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एसीच्या हवेमुळे झोप न येण्याची समस्या तसेच अधिक झोपेची समस्याही उद्धभवते.
एसीत जास्त वेळ राहिल्याने पाठीचा त्रास जाणवू शकतो.