तुम्हाला परफेक्ट फिटिंग जीन्स हवी असल्यास ती खरेदी करताना ‘या’ 4 टिप्स फॉलो करा
अनेक वेळा जीन्स खरेदी करताना आपण लहान लहान चुका करतो आणि फिटिंग खराब होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला जीन्स खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे सांगणार आहोत.
1 / 5
कोणते कपडे घालावेत याबाबत महिलांच्या मनात नेहमीच संभ्रम असतो. पण जीन्स हा असा आउटफिट आहे, जी वापरण्यापूर्वी फारसा विचार करावा लागत नाही. जीन्ससोबत तुम्ही कोणत्याही प्रकारचा स्टायलिश टॉप वापरू शकता, कुर्ता घालू शकता. पण अनेक वेळा जीन्स खरेदी करताना आपण लहान लहान चुका करतो आणि फिटिंग खराब होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला जीन्स खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे सांगणार आहोत.
2 / 5
आजकाल प्रत्येकजण व्यस्त आहेत, त्यामुळे लोक अनेकदा बहुतेक करून ऑनलाइन जीन्स खरेदी करू लागले आहेत. पण जीन्स शक्यतो दुकानातून खरेदी करा, यामुळे तुम्हाला फुल फिटिंग जीन्स मिळेल. तुम्ही जीन्स ऑफलाइन खरेदी केल्यास, दुकानदार स्वत: फिटिंगची समस्या जीन्स लुज असेल तर दुकाना असलेले टेलर ती समस्या दुरुस्त करतात, परंतु ऑनलाइनमध्ये असे होत नाही.
3 / 5
तुम्ही दुकानातून जीन्स खरेदी करणार असाल तर तीन साईज ट्राय करून पहा. तुमच्या कंबरेच्या मापाची जीन्स वापरून पाहा, एक लहान आणि दुसरी मोठी. खरं तर, आपण नेहमी एकाच आकाराची जीन्स खरेदी करतो. पण तसे करू नये. तुम्ही जेव्हा नवीन जीन्स खरेदी कराल तेव्हा तीन साइज ट्राय करून पहा.
4 / 5
गेल्या काही वर्षांत, जीन्सच्या स्टाईस, पार्टन मध्ये बऱ्याच एक्सपरिमेंट्स झालेल्या आपण पाहिल्या. विशेष म्हणजे लोक नवनवीन स्टाइल्सला खूप फॉलो करतात. ट्रेंडनुसार जीन्स खरेदी करताना सर्वात प्रथम तुम्ही तुम्हाला ती आवडते की नाही हे पहा. शक्यतोवर, नेहमी स्ट्रेट फिट किंवा स्लिम फिट यासारख्या क्लासिक स्टाइल्म मध्ये जीन्स खरेदी करणं उत्तम.
5 / 5
तुम्ही जीन्स खरेदी करायला जाता तेव्हा नेहमी असे फुटवेअर कॅरी करा जे तुम्ही शक्यतो जीन्सवर वापरता. जसे की फ्लॅट किंवा स्नीकर्स. त्याने तुम्हाला नव्या जीन्सवर ते कसे दिसतात ते समजेल.