वाढत्या वयाला कंट्रोल करायचं असेल तर रोज ही योगासनं करा, आयुष्य वाढवा
योगासनाने आपल्या शरीराला लवचिक बनवत नाहीत तर मेंदूला देखील आरोग्यदायी करतात. योगासने वाढत्या वयात माणसाला चुस्त आणि तंदुरुस्त होण्याासठी मदत करतात. तर पाहूयात कोणती योगासनं रोज करायला हवीत.
1 / 6
वाढत्या वयाचा परिणाम पायांवर देखील होत असतो. थोडेसे चालल्याने पायाचे स्नायू दुखू लागतात. गुडघ्यात दुखू लागते. त्यामुळे रोज उत्कटासन करावे, यामुळे पायाच्या टाचा, पोटरी, मांड्या, माकड हाड आणि गुढघे येथील स्नायू बळकट होतात. तसेच यामुळे पचनसंस्था देखील कार्यरत होऊन हृदयाला देखील आराम मिळतो. ( Pic Credit: Pexels )
2 / 6
वीरभद्रासन म्हणजे इंग्रजीत वॉरियर पोझ..या आसनाने शरीराला मजबूती मिळते. हे आसन केल्याने खांदे, घोटा, पाठ, हात, पायांचे स्नायू आणि हाडे मजबूत होतात. कंबर दुखी, सांधे दुखी दूर होते आणि मानसिक एकाग्रता वाढते
3 / 6
वाढत्या वयात हृदय आणि फुप्फुसांची ताकद कायम राखण्यासाठी भुजंगासन करायला हवे. हे आसन माकड हाडाला लवचिक बनवते. महिलांना मासिक पाळीत फायदा होतो. या आसनाने थकवा दूर होऊन तंदुरुस्ती वाढते
4 / 6
बलासन केल्याने शरीरासह मेंदूला देखील फायदा मिळतो. या आसनाने घोटा आणि मांड्या मजबूत होतात. हृदयाला देखील फायदा होतो. तसेच डोके आणि रक्ताभिसरण सुधारते. त्यामुळे केस गळण्याची समस्या, सुरकुत्या आदीपासून बचाव होतो. हे आसन काही सेंकद केल्यानंतरही रिलॅक्स वाटते.
5 / 6
लहानांपासून मोठ्यांपर्यंत ताडासन सर्वांना फायद्याचे असते. हे आसन करण्यासाठी सोपे असून त्याचे फायदे देखील खूप आहेत. वाढत्या वयात खांदे आणि पाठीला पोक येते. ताडासन नियमित केल्याने ही समस्या दूर होते. तसेच माकड हाडाचे कार्य देखील सुरळीत चालते.शरीराचा आकार नीट होतो.पाठ, कंबर आणि मांड्या येथील अवघडलेपण दूर होऊन दुखणे बरे होते.
6 / 6
ताण आणि तणावामुळे माणूस वेळे आधीच म्हातारा होतो. तणावापासून दूर राहण्यासाठी रोज मेडीटेशन करायला हवे, यामुळे तूमचा मूड उत्तम राहील आणि शरीरातील स्नायूंची दुखणी देखील बरी होतील.तसेच वाढत्या वयात तुमची स्मरणशक्ती वाढून झोप देखील चांगली येईल. Pic Credit: Pexels