अभिनेता संजय दत्तनं कॅन्सरशी झुंज जिंकल्यापासून तो चर्चेत आहे, तर दूसरीकडे त्याच्या कुटुंबातही आनंदाचं वातावरण आहे.
22 ऑक्टोबरला संजय दत्त आणि मान्यता दत्त यांच्या दोन्ही मुलांचा 10वा वाढदिवस पार पडला. या दिवसाला स्पेशल बनविण्यात मान्यतानं पूर्ण प्रयत्न केलेत.
मान्यतानं घरी डेकोरेशन करत दोघांचाही वाढदिवस साजरा केला. मात्र संजय दत्त मुलांच्या वाढदिवसाला हजर राहू शकला नाही.
कॅन्सरच्या उपचारानंतर संजय दत्त मुंबईत दाखल झाला आहे. मात्र मान्यता, इकरा आणि शहरान सध्या दुबईमध्ये आहेत.
मान्यता दत्तनं वाढदिवसाचे हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.