कोरोनामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात भरपूर बदल झाले. लॉकडाऊन झालं आणि सगळ ठप्प झालं, मात्र आता जग पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली. अर्थात जीवन जगण्याच्या पद्धतीत बदल झाले आहेत.
कोरोनापासून वाचण्यासाठी घरातून काम करण्याचा नवा मार्ग शोधण्यात आला. अर्थातच न्यू नॉर्मलचा . मनोरंजन विश्वातील शुटिंग आता सुरू झाल्या आहेत. मात्र कोरोनाचं संकट कायम असल्यानं आता कलाकारही घरातून काम करण्याला पसंती देत आहेत.
याची झलक अभिनेत्री इलियाना डिक्रूजनं तिच्या सोशल अकाऊंटवरुन दिली आहे. तिनं आपण रनदिप हुड्डासोबत व्हर्च्युअल स्क्रिप्ट रिडिंग करत असल्याचं चाहत्यांना सांगितलं आहे.
हा फोटो तिनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. सोबतच तिनं 'व्हर्च्युअल स्क्रिप्ट रिडिंग बी लाईक....' असं कॅप्शन दिलं आहे.
इलियाना सोबतच रनदिप हुड्डानं देखिल हा फोटो त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.