Marathi News Photo gallery IMD Cyclone Fengal Alert Cyclone will hit at a speed of 90 kilometers per hour heavy rains expected
Cyclone Fengal Alert : ताशी 90 किलोमीटर वेगानं धडकणार चक्रीवादळ; उरले काही तास, महाराष्ट्रात मुसळधार पावसापेक्षाही मोठं संकट
पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झालं आहे. फेंगल चक्रीवादळाचा परिणाम आज दुपारपासून दिसू लागला आहे. ताशी 90 किलोमीटर इतका प्रचंड वेग या चक्रीवादळाचा आहे.
1 / 7
पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झालं आहे. फेंगल चक्रीवादळाचा परिणाम आज दुपारपासून दिसू लागला आहे. ताशी 90 किलोमीटर इतका प्रचंड वेग या चक्रीवादळाचा आहे.
2 / 7
हे चक्रीवादळ आता प्रचंड वेगानं तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशच्या किनारपट्टी भागाकडे सरकत आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे तामिळनाडूच्या विविध भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस सुरू झाला आहे. तसेच आंध्र प्रदेशच्या दक्षिण भागात देखील जोरदार पाऊस सुरू आहे.
3 / 7
फेंगल चक्रीवादळामुळे जोरात वारं वाहू लागलं आहे. या वाऱ्याचा वेग ताशी 90 किमी इतका आहे.हवा जोरात वाहत असल्यामुळे आज संध्याकाळी सातपर्यंत चेन्नई विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
4 / 7
फेंगल चक्रीवादळ आज संध्याकाळपर्यंत पुद्दुचेरी आणि तामिळनाडूच्या उत्तर किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं. या चक्रीवादळामुळे आज आणि उद्या अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
5 / 7
दरम्यान देशातील ज्या भागांमध्ये या चक्रीवादळाचा प्रभाव दिसून येणार आहे, अशा प्रभाव क्षेत्रातील लोकांना हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर काही नागरिकांचं स्थलांतर देखील करण्यात आलं आहे.
6 / 7
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
7 / 7
महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात शित लहरींचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील कमाल तापमानामध्ये मोठी घट होईल, राज्यातील काही भागांमध्ये तापमान दहा अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकतं असा अंदाज आहे.