Marathi News Photo gallery IMD Monsoon Forecast 2025 How will monsoon be in Maharashtra in the new year Important information from Meteorological Department
IMD Monsoon Forecast 2025 : नवं वर्ष महाराष्ट्रासाठी धोक्याचं? मान्सूच्या पावसाबाबत हवामान विभागाकडून मोठी अपडेट
काही ठरावीक वर्षांनंतर जगभरात अल नीनो आणि ला नीनाचा परिणाम पाहायला मिळतो. सामान्यपणे या दोन्ही संकल्पना या प्रशांत महासागराशी संबंधित आहेत. मात्र त्याचा परिणाम हा मान्सूनच्या पावसावर होतो.
1 / 7
काही ठरावीक वर्षांनंतर जगभरात अल नीनो आणि ला नीनाचा परिणाम पाहायला मिळतो. सामान्यपणे या दोन्ही संकल्पना या प्रशांत महासागराशी संबंधित आहेत. मात्र त्याचा परिणाम हा मान्सूनच्या पावसावर होतो. ज्याचा फटका हा संपूर्ण जगाला बसतो. यावर्षी ला निनासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.
2 / 7
जागतिक हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार सध्या भारतासह जगभरात वातावरण सामान्य आहे. मात्र पुढच्या वर्षी जानेवारी ते फेब्रुवारी या काळात जगभरात ला निनासाठी अनुकूल वातावरण बनत असून, या काळात ला निना सक्रिय होण्याची शक्यता 55 टक्क्यांपेक्षा अधिक आहे.
3 / 7
ला निनाचा परिणाम हा जगाच्या दक्षिण भागात आणि उत्तर भागात वेगवेगळा दिसून येतो. ला नीना सक्रिय झाल्यास दक्षिण गोलार्धात उष्णता प्रचंड प्रमाणात वाढते, त्याचा परिणाम वणव्या सारख्या घटना घडतात. तर या उलट उत्तर गोलार्धात कडाक्याची थंडी पडते.
4 / 7
मात्र भारतीय उपखंडात ला निनाचा परिणाम हा उष्णतेसोबतच मान्सूनच्या पावसावर देखील होतो. जर जागतिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान ला निना सक्रिय झाले तर भारतामध्ये पुढील वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.
5 / 7
जेव्हा अल निनोचा प्रभाव असतो तेव्हा त्याचा परिणाम उलटा होतो. मान्सूनसाठी प्रतिकूल वातावरण बनतं त्यामुळे सरासरी इतका देखील पाऊस पडत नाही, त्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण होते.
6 / 7
मात्र जागतिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील वर्षी जगासह भारतात ला निनाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ देशात पावसाचं प्रमाण चांगलं राहण्याची शक्यता असून, काही भागात अतिवृष्टीची देखील शक्यता आहे.
7 / 7
महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. दरम्यान या वर्षी जर ला निनाचा प्रभाव राहिला तर सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडून पुन्हा एकदा अतिवृष्टीच्या संकटाचा सामना करावा लागू शकतो. मात्र मान्सूनसाठी सामान्य स्थिती राहिल्यास या वर्षी राज्यात चांगला आणि सामान्य पाऊस पडण्याची शक्यता आहे.