महाराष्ट्रात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. मात्र आता अचानक वातावरणात मोठा बदल पाहायला मिळत आहे. आयएमडीकडून पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Image Credit source: tv9 marathi
Follow us on
महाराष्ट्रात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. मात्र आता अचानक वातावरणात मोठा बदल पाहायला मिळत आहे. आयएमडीकडून पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुन्हा एकदा सायक्लोनिक सर्क्युलेशनसारखी स्थिती निर्माण झाली आहे, याचाच परिणाम म्हणून राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दक्षिणेकडून येणार्या वाऱ्याचा मोठा फटका बसणार असून, महाराष्ट्रासह कर्नाटकात हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
29 आणि 30 मार्चला कोकणातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. तर राज्यातील इतर काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोकणातील सिंधुर्दुग आणि रत्नागिरीमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर पश्चिम महाराष्ट्रात सातारा आणि कोल्हापूरमध्ये ढगांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा अंदाज आहे.
दुसरीकडे मुंबई, पुणे, ठाणे आणि इतर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आयएमडीकडून वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान महाराष्ट्राप्रमाणेच देशातील इतर काही राज्यांमध्ये देखील या काळात पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसू शकतो.