Immunity Booster Food | कोरोना काळात इम्युनिटीची चिंता सतावतेय? मग, ‘हे’ घटक आहारात नक्की सामील करा!
सध्या कोरोना महामारीच्या काळात जो-तो आपल्या कुटुंबासह स्वतःची काळजी घेण्यात व्यस्त आहे. साफसफाईपासून ते सोशल डिस्टंसिंगपर्यंत सगळ्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे. या सगळ्यासोबत कोरोनापासून बचावासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे ‘रोगप्रतिकारक शक्ती’ (Immunity).
1 / 6
सध्या कोरोना महामारीच्या काळात जो-तो आपल्या कुटुंबासह स्वतःची काळजी घेण्यात व्यस्त आहे. साफसफाईपासून ते सोशल डिस्टंसिंगपर्यंत सगळ्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे. या सगळ्यासोबत कोरोनापासून बचावासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे ‘रोगप्रतिकारक शक्ती’ (Immunity). रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी, याविषयी सगळेच संभ्रमात असतात. यातही विशेषतः शाकाहारी लोकांना कायम याचा विचार करावा लागतो. त्यामुळे आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या 5 शाकाहारी घटकांची माहिती जाणून घेणार आहोत.
2 / 6
खोबरेल तेल रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यात खूप मदत करते. शुध्द नैसर्गिक खोबरेल तेल अनेक व्याधींवर गुणकारी ठरते. नारळाच्या तेलात मोनोलोरीन असते, जे शरीरातील अपायकारक जीवाणू नष्ट करण्यास मदत करते. यासह वजन कमी करण्यासाठी देखील खोबरेल तेल खूप फायदेशीर आहे.
3 / 6
रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी काळी मिरीदेखील फायदेशीर आहे. काळी मिरी एक शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट आहे. ज्यामुळे सर्दी आणि खोकला कमी होण्यास मदत होते. कफ प्रकृतीसाठी काळी मिरी खूप फायदेशीर मानली जाते.
4 / 6
रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी काळी मिरीदेखील फायदेशीर आहे. काळी मिरी एक शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट आहे. ज्यामुळे सर्दी आणि खोकला कमी होण्यास मदत होते. कफ प्रकृतीसाठी काळी मिरी खूप फायदेशीर मानली जाते.
5 / 6
काळी मिरीप्रमाणेच हळद देखील एक शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट आहे. हळदीत अँटी-इंफ्लेमेटरी घटक आहेत. जर आपल्याला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असेल, तर हळदीचे दूध पिणे फायदेशीर ठरते. यामुळे पडश्यात आराम पडतो.
6 / 6
काळ्या तीळाप्रमाणे दिसणारा कलौंजी हा मसाल्यातील घटक रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यातदेखील खूप मदत करतो. यात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत.