IPL 2023 : आयपीएलमध्ये या गोलंदाजांनी साधला डाव, फलंदाजांना खेळणं केलं मुश्किल
टी 20 क्रिकेट फॉर्मेट फलंदाजांचा खेळ समजला जातो. पण आयपीएलमध्ये जरा वेगळंच चित्र आहे. या स्पर्धेत गोलंदाजांनीही आपली छाप सोडली आहे. चला जाणून घेऊयात या गोलंदाजांबाबत
1 / 6
क्रिकेट हा आता फलंदाजांचा दृष्टीने पूरक असा खेळ आहे. नियमांपासून पिचपर्यंत फलंदाजांच्या बाजूने आहेत. मात्र इतकं असूनही गोलंदाजांनी आपली छाप सोडली आहे.
2 / 6
आयपीएलमध्ये सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम ड्वेन ब्रावोच्या नावावर आहे. चेन्नई सुपरकिंग्सच्या अष्टपैलू खेळाडूने सर्वाधिक 181 गडी बाद केले आहे. तर लसिथ मलिंगा 170 गडी बाद करत दुसऱ्या स्थानावर आहे. (Photo- PTI)
3 / 6
राशिद खान आयपीएलमधील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. लेग स्पिनरने प्रति ओव्हर फक्त 6.35 रन्स दिल्या आहेत. 100 हून जास्त गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांपेक्षा चांगलं आहे. (Photo - BCCI)
4 / 6
भुवनेश्वर कुमारनं आयपीएलमध्ये सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकले आहेत. त्याने 1400 चेंडूवर एकही धाव दिलेली नाही. त्यानंतर 1357 डॉट बॉलसह आर. अश्विन दुसऱ्या स्थानावर आहे. 1346 डॉट बॉलसह सुनील नरेन तिसऱ्या स्थानावर आहे. (Photo- IPL)
5 / 6
आयपीएलच्या एका पर्वात सर्वाधिक विकेट घेण्याचा मान हर्षल पटेलच्या नावावर आहे. त्याने आयपीएल 2021 मध्ये 15 सामन्यात 32 गडी बाद केले होते. ड्वेन ब्रावोनही एका पर्वात 32 गडी बाद केले आहेत. पण यासाठी त्याला 18 सामने खेळावे लागले होते. (Photo- BCCI)
6 / 6
आयपीएलमध्ये एका सामन्यात सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम अल्जारी जोसफच्या नावावर आहे.वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजाने 12 धावा देत 6 गडी बाद केले आहेत. तर सोहेल तनवीरने 14 धावा देत 6 गडी आणि अॅडम झांपाने 19 धावा देत सहा गडी बाद केले आहेत. (Photo- AFP)