कोल्हापुरात शॉर्टसर्किटमुळे घराला लागलेल्या आगीत संसार जाळून खाक
कसारा येथील मिलिंद नगर परिसरातील असलेल्या टेकडीवर एका घरकाम करणाऱ्या महिलेच्या घरास शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये आगीचा भडका उडाल्याने घरातील सिलेंडरचाही स्फोट झाल्याची घटना घडली आहे.
1 / 4

2 / 4
आग लागल्याची घटना घडली त्या दरम्यान घरात कोणाही उपास्थित नसल्याने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन टीमच्या सदस्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणली. या घटनेत घरातील सर्व संसारउपयोगी वस्तू जळून नष्ट झाल्या.
3 / 4
आग विझवण्याचे काम सुरु असताना आपत्ती व्यवस्थापन टीमच्या एका सदस्याचा पायाला दुखापत झाली आहे. वेळीच आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टाळला असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
4 / 4
आगीच्या घटनेमुळे घरकाम करू आपले जीवन जगणाऱ्या महिलेवर उपासमारीची वेळ आली आहे. या घटनेमुळे पीडित निराधार महिलेसमोर घर पुन्हा उभे करण्याचे मोठे प्रश्न उपस्थित झाले आहे.