प्रदुषणात झालीय वाढ, अस्थमाग्रस्तांसाठी ही योगासने फायदेशीर

| Updated on: Nov 02, 2024 | 10:21 PM

हिवाळ्यात प्रदुषणात वाढ होत असते. दिवाळीच्या फटाक्यांनी देखील प्रदुषणात गेले काही दिवस वाढ झाली आहे. अस्थमाच्या आजारात प्रदुषणाचा मोठा त्रास होत असतो. त्यामुळे अस्थमांच्या रुग्णांना जास्त काळजी घ्यायची असते. अस्थमांच्या रुग्णांनी काही सोपी आसने जर रोज केली तर त्यांच्या प्रकृतीस चांगला आराम वाटू शकतो.

1 / 5
अस्थमाच्या रुग्णासाठी भुजंगासन खूपच फायदेशीर असते. हे आसन केल्याने छाती आणि पोटाचे स्नायूंचे प्रसरण होते.तसेच फुप्फुसाचे कार्य सुधारण्यासाठी फायदा होतो. तसेच भुजंगासन केल्याने ब्लड सर्क्युलेशन वाढत असते. ताणतणाव कमी होतो. आणि मानसिक स्वास्थ्य देखील सुधारते.

2 / 5
सेतू बंधासन नियमित रुपाने केल्यास अस्थमात फायदा होतो. या आसनाने छातीतील स्नायूंचा व्यायाम होतो. आणि फुप्फुसाची क्षमता देखील वाढते. या आसनाने गुडघे आणि कंबर, मांडी, पोटाच्या स्नायूंचा व्यायाम होऊन लाभ होतो.

3 / 5
मत्स्यासनाने आपल्या फुप्फुसाच्या कार्यक्षमतेत मोठी वाढ होते. गळा आणि मानेचे स्नायू लवचिक होतात.त्यामुळे श्वसनाचे आजार असलेल्या अस्थमा रुग्णांना या आसनाचा मोठा लाभ होतो.

4 / 5
 योगासनासोबत अस्थमा पेशंटने रोज प्राणायम देखील केला पाहीजे. कारण श्वसनाची क्षमता त्याने वाढते. भस्क्रीका, प्राणायम अस्थमा,ब्रोकाइटिस आणि सायनस वाल्यासाठी खूपच फायदेमंद असतो.हे योगासन हार्मोन संतुलित करणे आणि ताण तणाव कमी करण्यासाठी तसचे एनर्जी वाढविण्यासाठी फायदेशीर आहे.

5 / 5
 अनुलोम-विलोम सरल आणि सोपा प्राणायम आहे. रोज 5 ते 8 मिनिटे हे केले तरी याचा फायदा खूप होतो. यास श्वास एका नाकपुडीतून खेचून दुसऱ्या नाकपुडीतून सोडायचा असतो. ही क्रिया वारंवार केली तर अस्थमा, डोकेदुखी, मायग्रेन आणि ब्लडप्रेशर असा समस्या दूर होण्यास मदत होते.