World heritage day | ‘अतुल्य भारत’ आंतरराष्ट्रीय वारसा स्थळ दिनानिमित्त जाणून घ्या भारतातील जागतिक वारसा स्थळे

| Updated on: Apr 18, 2022 | 10:22 AM

भारतातील अशा अनेक जागा आहेत ज्या एखाद्या सहस्यांपेक्षा कमी नाहीत. म्हणूनच भारताला अतुल्य भारत म्हणतं नाही. भारतात कोठेही जा तुम्हाला नेहमी वेगळे काहीतरी पाहायला मिळेल. येथे संस्कृती कलेचा उत्तम मेळ आपल्याला पाहायला मिळते. येथील मोहक दृश्ये आणि प्रेरणादायक कथा दर्शवतील. या ठिकाणी आपल्याला इतिहास आणि वारसा संबंधित गोष्टी दिसतील.

1 / 5
साताऱ्याच्या पर्वत रंगांमध्ये कासचे पठार आहे. याचा समावेश 2012 साली युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत समावेश केला गेला आहे. या पठारावरील कास तलाव सातारा शहराला पाणीपुरवठा करतो. या पठारावर पावसाळा सुरू झाल्यावर असंख्य प्रकारची रानफुले फुलतात.

2 / 5
अजिंठा लेणी इ.स.पू. 2 शतकापासून 650 सीई पर्यंत बनली आहेत. अजिंठा लेणी ही भारतातील पहिल्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक आहे.  त्याच्या अजिंठा लेणींमधील बहुतेक भिंतींवर बौद्ध धर्माशी संबंधित कोरीव कामं आहेत. अजिंठा हा एकूण 30 लेण्यांचा समूह आहे. प्रामुख्याने कोरीव मूर्ती आणि बुद्धांच्या जीवनाशी संबंधित शिल्पे आहेत.

3 / 5
मध्य प्रदेशात वसलेले, खजुराहो हे भारतातील प्रसिद्ध युनेस्को जागतिक वारसा आहे. हे मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात आहे. येथे मोठ्या संख्येने हिंदू आणि जैन मंदिरे आहेत. हे ठिकाण तेथे असणाऱ्या शिल्पांसाठी प्रसिध्द आहे. यात भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा दिसून येतो. यातील बहुतेक स्मारके  कारकिर्दीत इ.स. 950 ते 1050 दरम्यान बांधली गेली ती चांदेला घराण्यतील लोकांनी बनवलेली आहेत. खजुराहो संकुलातील या सर्व मंदिरांपैकी कंदारिया मंदिर सर्वात प्रमुख आहे.

4 / 5
जगाच्या सात आश्चर्यांपैकी एक ताजमहाल हे सुद्धा  जागतिक वारसा आहे.  ताजमहालला सम्राट शाहजहानने आपली पत्नी मुमताज महल यांच्या स्मरणार्थ बनविला होता. हे आग्रा येथील यमुना नदीच्या काठावर वसलेले आहे. 1653 मध्ये 32 दशलक्ष भारतीय रुपयांच्या खर्चासह हे काम पूर्ण झाले होते, जे आज 58 अब्ज भारतीय रुपयांच्या समान आहे. हे जगभरातील मुघल स्थापत्यकलेतील  सर्वोत्कृष्ट उदाहरण मानले जाते.

5 / 5
आसाममधील काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये एक-शिंगी गेंडा आहे. आसाम सरकारने येथे वनस्पती आणि प्राणी जतन करण्यासाठी बरेच प्रयत्न केले आहेत. लॉर्ड कर्झनने भारतातील जागतिक वारसा स्थळ निर्माण केले होते. कर्झनच्या यांच्या पत्नीला या भागात एकही गेंडा पहायला मिळाला नाही. तेव्हा त्यांनी आपल्या पतीला या संकटात सापडलेल्या प्रजातींचे संवर्धन करण्याचा आग्रह केला. त्यावेळीस या प्रकल्पाची निर्मीती झाली.