टीम इंडियामध्ये खेळण्याचं प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. यासाठी सर्व खेळाडू खूप मेहनत घेत असतात. मात्र यामधील काहींचं हे फक्त स्वप्नच राहून जातं. तर काही शेवटपर्यंत जिद्द चिकाटी सोडत नाहीत आणि आपलं लक्ष्य गाठल्यावरच ते थांबतात. महिला भारतीय संघामध्ये एका आदिवासी पाड्यामधील एका खेळाडू टीम इंडियाकडून खेळत आहे.
बांगलादेशविरूद्ध सुरू असलेल्या पहिल्या टी-20 सामन्यामध्ये या खेळाडूने पदार्पण केलं आहे. पहिला सामना प्रत्येकासाठी खास असतो. संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावण्याची प्रत्येकाची इच्छा असते.
ह खेळाडू दुसरी तिसरी तिसरी कोणी नसून मिन्नू मणील ही आहे. आजच्या सामन्यात तिने 3 ओव्हर टाकत 21 धावा देत 1 विकेट घेता आली.
मिन्नू मणी हीक केरळमधील वायनाड इथली आहे. उपकर्णधार स्मृती मानधनाने तिला डेब्यू कॅप दिली.
दरम्यान, मिन्नू मणीला वूमन्स प्रीमिअर लीगमध्ये 30 लाखांची बोली लागली होती. दिल्ली कॅपिटल्स संघाने तिला आपल्या ताफ्यात घेतलं होतं.