विराट कोहली दुसऱ्या डावात फक्त 17 धावा करून तंबूत, पण मोडून गेला सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड

| Updated on: Sep 20, 2024 | 6:30 PM

भारत आणि बांग्लादेश यांच्यात पहिला कसोटी सामन्याचा दुसरा दिवस संपला. दुसऱ्या दिवसअखेर टीम इंडियाने 3 गडी बाद 81 धावा केल्या. यावेळी विराट कोहली पुन्हा एकदा फेल गेला. अवघ्या 17 धावांवर पायचीत होत तंबूत परतला. पण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला.

1 / 5
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे. भारताला पहिल्या डावात 227 धावांची आघाडी मिळाली आहे. तसेच दुसऱ्या डावात 3 गडी बाद 81 धावा केल्या आहेत. त्यामुळे 308 धावांपर्यंत मजल मारली आहे. शुबमन गिल नाबाद 33 आणि ऋषभ पंत नाबाद 12 धावांवर खेळत आहेत.

2 / 5
विराट कोहली पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावात फेल गेला. पहिल्या डावात फक्त 6 धावा करता आल्या. तर दुसऱ्या डावात 17 करून तंबूत परतला. म्हणजेच त्याने एकूण 23 धावा केल्या.

3 / 5
विराट कोहलीने 23 धावा करत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एक विक्रम मोडीत काढला आहे. विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात 12 हजार धावा पूर्ण केल्या आहेत.

4 / 5
विराट कोहलीने दुसऱ्या डावात पाचवी धाव घेत हा कारनामा केला आहे. 243 डावात त्याने हा विक्रम पूर्ण केला आहे. सचिनला या विक्रमासाठी 267 डाव खेळावे लागले होते.

5 / 5
विराट कोहली भारतात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. सचिन तेंडुलकरने 14192 धावा केल्या आहेत. तर विराट कोहली 12012 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे.