रोहित शर्मा याने याने श्रीलंकेविरूद्ध अवघ्या दोन धावा करत त्याने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. वन डे क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीमध्ये रोहितने चौथं स्थान गाठलं आहे.
रोहितने टीम इंडियाचे माजी कोच राहुल द्रविडचा रेकॉर्ड मोडला आहे. वन डे क्रिकेट इतिहासामध्ये रोहित शर्माने 10,760 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
या यादीमध्ये पहिल्या स्थानावर सचिन तेंडुलकरने 463 सामन्यात 18426 धावा केल्या आहेत. दुसऱ्या स्थानावर विराट कोहलीने 294 सामन्यात 13872 धावा तर तिसऱ्या क्रमांकावर सौरव गांगुलीन असून 308 सामन्यात 11221 धावा केल्यात. आता रोहित चौथ्या स्थानावर असून त्याने 264 सामन्यात 10,831 धावा केल्यात.
रोहितने श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यातही अर्धशतक पूर्ण केलं होतं. रोहितने दुसऱ्या सामन्यात 44 बॉलमध्ये 64 धावा केल्या. यामध्ये 4 सिक्स आणि 5 चौकार त्याने मारले.
रोहित शर्माने वन डे क्रिकेटमध्ये 264 सामन्यात 31 शतके तर 57 अर्धशतके ठोकली आहेत. भारताकडून सर्वाधिक 330 षटकार मारले आहेत