ind vs zim 2nd T20 : वाह रे पठ्ठ्याsss, शतक एक विक्रम अनेक, अशी कामगिरी करणारा अभिषेक शर्मा पहिलाच खेळाडू

| Updated on: Jul 07, 2024 | 8:44 PM

टीम इंडिय आणि झिम्बाब्वेमध्ये झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात युवा खेळाडूंनी 100 धावांनी विजय मिळवला. पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये टीम इंडियाने आता 1-1 ने बरोबरी केलीये. या सामन्यात सलामीवीर अभिषेक शर्मा याने वादळी शतकी खेळी केली. या शतकासह अभिषेक शर्माने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

1 / 5
पहिल्या टी-20 सामन्यात पराभूत झाल्यानंतर मैदानात टीम इंडिया मैदानात उतरली होती. दुसऱ्याच ओव्हरमध्ये कॅप्टन शुबमन गिल आऊट झाला. त्यामुळे पुन्हा भारतीय संघाचा डाव गडगडतो की काय अशी भीती वाटत होती. मात्र अभिषेक शर्माने त्यानंकर टॉप गियर टाकला आणि  झिम्बाब्वेच्या गोलंदाजीतील पिसे उपटून काढलीत.

2 / 5
अभिषेक शर्माने 47 बॉलमध्ये 100 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये त्याने 7 चौकार आणि 8 षटकार मारले. आपला करियरमधील दुसराच सामना खेळणाऱ्या अभिषेकने गोलंदाजांचा पक्का घाम काढला. पहिल्या सामन्यात शून्यावर आऊट झाल्यामुळे ट्रोल करणाऱ्यांना त्याने शतक ठोकत उत्तर दिलं.

3 / 5
सर्वात कमी डावात T20  शतके करणारा अभिषेक शर्मा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. अभिषेक शर्माने दुसऱ्याच सामन्यात शतक केलं आहे. याआधी दीपक हुड्डा याच्या नावावर हा विक्रम होता. हुड्डाने 3 सामन्यात शतक केलं होतं.

4 / 5
झिम्बाब्वेमध्ये T20 आंतरराष्ट्रीय शतक करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरलाय. याआधी एकाही भारताच्या खेळाडूल ही कामगिरी करता आलेली नव्हती. अॅरोन फिंचने 2018, स्‍टीवन टेलरने 2022 आणि आज अभिषेक शर्मा या यादीत जाऊन बसला आहे.

5 / 5
T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करणारा अभिषेक शर्मा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. हा विक्रम रोहित शर्माच्या नावावर असून त्याने 35 बॉलमध्ये 2017 साली श्रीलंकेविरूद्ध शतक केलं होतं. अभिषेक शर्माने 46 बॉलमध्ये हा कामगिरी केली आहे.