७६ वा स्वातंत्र्य दिनाचा मुख्य सोहळा नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाचा मैदानावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली, तर उत्तर महाराष्ट्र नंदुरबार जिल्ह्यातील काही भागात अजूनही पाऊस झालेला नसताना यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहे, की चांगला आणि लवकर पाऊस पडला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांवरील संकट राहणार नाही.
पिण्याच्या पाण्याचे प्रश्न देखील मिटतील, मात्र पाऊस आला नाही, तर यासाठी जिल्हा प्रशासन उपायोजना करणार आहे.
ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना विविध पुरस्कार आणि पालकमंत्र्यांनी जिल्ह्यावसियांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी स्वातंत्र्य सनिक लोकप्रतिनिधी शासकीय अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.